सनातनच्या यादीतील नावे जाहीर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 12:48 AM2018-08-24T00:48:23+5:302018-08-24T00:49:11+5:30
नाशिक : विचारवंतांच्या मारेकऱ्यांचे सनातनशी संबंध उघड झाले आहेत. मुख्यमंत्री या गंभीर प्रकरणाबाबत मौन बाळगून आहेत. सनातन कोणता कट आखत होते व कोणत्या मोर्चात ते बॉम्बस्फोट घडविणार होते याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी जनतेपुढे करावा, अशी मागणी राष्टÑवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.
नाशिक : विचारवंतांच्या मारेकऱ्यांचे सनातनशी संबंध उघड झाले आहेत. मुख्यमंत्री या गंभीर प्रकरणाबाबत मौन बाळगून आहेत. सनातन कोणता कट आखत होते व कोणत्या मोर्चात ते बॉम्बस्फोट घडविणार होते याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी जनतेपुढे करावा, अशी मागणी राष्टÑवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. राष्ट्रवादी महिला कॉँग्रेसच्या विभागीय यात्रेच्या निमित्ताने आयोजित ‘संविधान बचाव, देश बचाव’ कार्यक्रमात पाटील बोलत होते. ते पुढे म्हणाले, देशात संवैधानिक मुद्द्यांना हरताळ फासला जात असून, मनुवादी विचारांना सरकारकडूनच प्रोत्साहन दिले जात आहे. देश एकसंघ ठेवण्यासाठी ज्या घटनेचा आधार आजवर घेतला गेला, ती घटनाच जाळून टाकण्याचे पाप याच सरकारच्या काळात करण्यात आले आहे. विशेष म्हणजे घटना जाळणाºयांवर अद्याप गुन्हा दाखल झाला नाही की त्यांचे नागरिकत्व रद्द करण्यात आलेले नाही याचाच अर्थ मनुस्मृतीकडे पुन्हा एकवार वाटचाल करण्याच्या दृष्टीने सरकारची पावले पडू लागली आहेत. सरकारच्या विरोधात बोलणाºयांचे आवाज बंद केले जात आहेत. प्रा. कुलबुर्गी, गौरी लंकेश, कॉ. गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या त्याचेच द्योतक असून, पाच वर्षांनंतर या साºया हत्यांमध्ये सनातन संस्थेचा हात असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना अटक केली असली तरी, त्यांचे खरे बोलविता धनी वेगळेच आहेत. आठ दिवस उलटूनही मुख्यमंत्री या प्रश्नावर काहीच बोलत नाही, असा आरोपही त्यांनी केला. सध्याचे सरकार फक्त सत्ता टिकविण्यासाठी सत्तेचा गैरवापर करीत असून, स्व. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींचे अल्पमतातील सरकार दोन वेळेस पडले परंतु त्यांनी कधीही सत्ता टिकविण्यासाठी सत्तेचा गैरवापर केला नाही. त्यामुळे त्यांच्या अंत्ययात्रेत पाच किलोमीटर पायी चालणाºया नरेंद्र मोदी यांनी अटलजींच्या जीवनातील पाच स्वभाव वैशिष्ट्ये जरी अंगीकारली तरी पाच किलोमीटर चालून मिळणाºया समाधानापेक्षा सव्वाशे करोड जनतेच्या मनाचे समाधान होईल, असा टोलाही त्यांनी लगावला.
छगन भुजबळ सिद्धूच्या पाठीशी
नवज्योतसिंग सिद्धू यांच्या पाकिस्तान भेटीवरून निर्माण झालेल्या गदारोळावर भुजबळ यांनी भाष्य केले. कांदा, साखर जे काही असेल ते पाकिस्तानातून आयात करणारे सरकार सिद्धूच्या भेटीवरून केवढा गजहब करीत आहेत, असा सवाल केला. ‘समोर भेटला की प्रत्येकाला मार मिठी, मग समोरच्याने मारो ना मारो’ अशा शब्दात मोदी यांचे नाव न घेता भुजबळ यांनी, हे वाट वाकडे करून पाकिस्तानला गेले तर चालते मग सिद्धू गेला तर चुकले कोठे, असा सवाल केला.