अकरावी प्रवेशासाठी सुधारित वेळापत्रक जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 05:59 PM2020-07-15T17:59:02+5:302020-07-15T18:00:58+5:30
अकरावी प्रवेशासाठी यापूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्रकात शिक्षण विभागाने बदल केला असून, सुधारित वेळापत्रकानुसार ही प्रक्रि या लांबणीवर टाकण्यात आली आहे. दि. २६ जुलैपासून अर्जाचा भाग एक भरण्यात सुरु वात होणार आहे, तर दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना महाविद्यालया निवडीसाठी अर्जाचा भाग दोन भरता येणार आहे.
नाशिक : अकरावी प्रवेशासाठी यापूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्रकात शिक्षण विभागाने बदल केला असून, सुधारित वेळापत्रकानुसार ही प्रक्रि या लांबणीवर टाकण्यात आली आहे. दि. २६ जुलैपासून अर्जाचा भाग एक भरण्यात सुरु वात होणार आहे, तर दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना महाविद्यालया निवडीसाठी अर्जाचा भाग दोन भरता येणार आहे.
अकरावी प्रवेश प्रक्रि येसाठी यापूर्वी शिक्षण विभागातर्फे अर्ज भरण्याची प्रक्रि या बुधवारपासून (दि. १५) सुरू होणार होती, मात्र मंगळवारी (दि. १५) रात्री उशिरा परिपत्रक जारी करून शिक्षण विभागाने वेळापत्रकात बदल केले आहेत. नाशिक महापालिका क्षेत्रासह पुणे, पिंप्री-चिंचवड, औरंगाबाद, अमरावती, नागपूर महापालिका क्षेत्र, मुंबई महानगर क्षेत्रात आॅनलाइन पद्धतीने अकरावीची प्रवेशप्रक्रि या राबविली जाणार आहे. सुधारित वेळापत्रकानुसार अर्ज भरण्याची प्रक्रि या दि. २६ जुलैपासून सुरू होईल. तर दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर महाविद्यालय निवडीसाठी अर्जाचा भाग दोन भरता येणार आहे. राज्यातील प्रमुख शहरांमध्ये इयत्ता अकरावीची प्रवेशप्रक्रि या आॅनलाइन पद्धतीने राबविली जाते. या पार्श्वभूमीवर यंदाही अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जारी केले होते. परंतु कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्यात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना महाविद्यालय, शाखा निवडीकरिता आवश्यक असलेला अर्जाचा भाग दोन भरता येणार आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांनी आॅनलाइन भरलेल्या अर्जातील माहिती, भाग एक आॅनलाइन तपासून व्हेरिफाय करण्यासाठी संबंधित शाळा, मार्गदर्शन केंद्राची प्रक्रि या दि.२७ जुलैपासून सुरू होणार आहे.