सटाणा नगर परिषदेच्या २२ आदर्श शिक्षक पुरस्काराची घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:18 AM2021-09-05T04:18:49+5:302021-09-05T04:18:49+5:30
लवकरच मोठ्या समारंभात नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या अध्यक्षतेखाली व सर्व नगरसेवक यांच्या उपस्थितीत व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते ...
लवकरच मोठ्या समारंभात नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या अध्यक्षतेखाली व सर्व नगरसेवक यांच्या उपस्थितीत व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारप्राप्त शिक्षकांना गौरविण्यात येणार असल्याचे डगळे यांनी सांगितले. येथील नगर परिषदेत नगराध्यक्ष सुनील मोरे व नगरसेवकांकडून घेण्यात आलेल्या निर्णयानुसार गेल्या तीन वर्षांपासून नगर परिषद कार्यक्षेत्रातील वास्तव्यास असलेल्या शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, माध्यमिक व प्राथमिक शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात येत आहे.
नगर परिषदेकडून स्वायत्त निवड समितीकडून पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या सहकार्याने ही निवड केली जाते. यंदाच्या पुरस्कारासाठी २२ जणांना विशेष समारंभात मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. सन २०२०-२१ व २०२१-२२ या वर्षासाठी नगर परिषदेतर्फे पुरस्कारासाठी नावांची घोषणा पत्रकार परिषद घेऊन करण्यात आली.
यावेळी पुरस्कारासाठी करण्यात आलेली नावे पुढीलप्रमाणे : संदीप भालचंद्र कोठावदे (मुख्याध्यापक प्रगती प्रा.शाळा सटाणा), किरण केवळ अहिरे (उपशिक्षक, जिल्हा जि.प. शाळा ढवळीविहीर), प्रशांत माधवराव देवरे (उपशिक्षक, जि. प. शाळा ब्राह्मणगाव), शोभा नामदेव पाटील (उपशिक्षक जि. प. शाळा लखमापूर), सरला सुखदेव बिरारी (उपशिक्षक जि. प. शाळा किकवारी खुर्द), संजय कारभारी देसले (मुख्याध्यापक माध्य. विद्यालय नांदेड), राजेंद्र बी. शेवाळे (उपशिक्षक आश्रम शाळा कपालेश्वर), शंकर भिकन राजपूत (उपशिक्षक माध्य. विद्यालय, सोमपूर), रुपाली संजय सोनवणे (मुख्याध्यापक, ब्लॉसम स्कूल सटाणा.) ललित पांडुरंग पाटील (उपशिक्षक, किलबिल इंग्लिश मे स्कूल सटाणा), दयाराम एम. राठोड (क्रीडा शिक्षक, जिजामाता कॉलेज सटाणा), हिरालाल बधान (केंद्रप्रमुख डांगसौंदाणे), भास्कर तुळशीराम मोरे (जि. प. शाळा विरगावपाडे), अरुण दशरथ पवार (जि. प. शाळा भामेश्वर), प्रकाश पुंजाराम सोनवणे (जि. प. शाळा सुकडनाला), तुषार महाजन (जि. प. शाळा लोहणेर), दिनेश रघुनाथ सोनवणे (जिल्हा जि. प. शाळा भिलवाडा), संजय सोनवणे (मुख्याध्यापक मराठा स्कूल सटाणा), जयवंत निंबा ठाकरे (उपशिक्षक माध्य. विद्यालय आसखेडा), सुनील यशवंत कापडणीस (जनता माध्य. विद्यालय डांगसौंदाणे), रिजवान कुतुबुद्दीन मन्सूरी (उपशिक्षक बागलान एज्युकेशन इंग्लिश मीडियम स्कूल सटाणा), सुनील गोटू लाड (कलाशिक्षक विद्यालय व्ही. पी. एन. विद्यालय, सटाणा).