केवळ मदतीची घोषणा; एक हजाराची निराधारांना प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:14 AM2021-05-13T04:14:41+5:302021-05-13T04:14:41+5:30

गेल्या वर्षभरापासून कोरोनाने संपूर्ण देशातच थैमान घातले असून, गेल्या वर्षी जवळपास चार महिने लॉकडाऊन झाल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ ...

Announcement of help only; Waiting for a thousand homeless people | केवळ मदतीची घोषणा; एक हजाराची निराधारांना प्रतीक्षा

केवळ मदतीची घोषणा; एक हजाराची निराधारांना प्रतीक्षा

Next

गेल्या वर्षभरापासून कोरोनाने संपूर्ण देशातच थैमान घातले असून, गेल्या वर्षी जवळपास चार महिने लॉकडाऊन झाल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. यंदाही तशीच परिस्थिती असली तरी गतवेळसारखी त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून केंद्र व राज्य सरकारच्या अनुदानावर राबविण्यात येणाऱ्या इंदिरा गांधी दिव्यांग, इंदिरा गांधी विधवा, इंदिरा गांधी वृद्धापकाळ, संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनांच्या लाभार्थ्यांना प्रत्येकी एक हजार रुपये अतिरिक्त मदत देण्याचे जाहीर केले. मात्र, त्यासाठी अजूनही निधीची तरतूद करण्यात आलेली नाही.

-----------------

मार्चपर्यंत लाभार्थ्यांना मदतीचे वाटप

* केंद्र व राज्य सरकारच्या अनुदानातून गोरगरीब, निराधार, विधवा, परितक्त्यांसाठी या योजना राबविल्या जातात. त्यात केंद्र व राज्य सरकारचा निम्मा निम्मा आर्थिक वाटा असतो.

* मदतीचे वाटप थेट लाभार्थ्यांच्या बॅँक खात्यावर पाठविण्यात येते. त्यामुळे या योजनेत गैरप्रकार होण्याची शक्यता कमीच.

------------------

या योजनांचे लाभार्थींकडून त्यांचे हयातीचे दाखले घेण्यात आले असून, त्यांची यादीही तयार आहे. शासनाकडून अनुदान प्राप्त होताच तात्काळ पैसे खात्यावर वर्ग केले जातील.

- डॉ. राजश्री अहिरराव, तहसीलदार, संगोयो

---------------------

गेल्या वर्षी मार्च महिन्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यामुळे हयातीचा दाखला देण्याची गैरसोय झाली होती. मात्र, त्यावेळी लॉकडाऊनमध्ये शासनाकडून प्राप्त झालेल्या लाभाचा चांगला उपयोग झाला.

- सुनीताबाई भोये

------------

शासनाच्या योजनांचा उदरनिर्वाह करण्यास हातभार लागला; परंतु तीन ते चार महिन्यांनंतर पैसे मिळतात. शासनाने ते दरमहा देण्याची व्यवस्था केल्यास सर्वच लाभार्थ्यांना त्याचा लाभ चांगल्या प्रकारे घेता येईल.

- सिंधूबाई निकम

-------------

निराधारांना या योजनांतून मोठा आधार दिला आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारचे धन्यवाद. मात्र, घोषणा केल्याप्रमाणे शासनाने अतिरिक्त एक हजार रुपये अद्याप मिळालेले नाहीत.

- देवबा भामरे

-----------

शासनाकडून दर तीन महिन्यांनी खात्यावर पैसे टाकले जातात. पैसे आले की नाही हे बॅँकेत जाऊनच समजते; परंतु सध्या बॅँकेतही खूप गर्दी व वेळही कमी केल्याने बॅँकेत जाऊन तपास करता येत नाही.

- आत्माराम फुलझाडे

-३५,२५८ संजय गांधी निराधार योजना

- १,०६,२४७ श्रावणबाळ निराधार

- ६५,७२२ इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना

- ६०१९- इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना

- ५८७ इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना

Web Title: Announcement of help only; Waiting for a thousand homeless people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.