एमपीएससीचे वेळापत्रक जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 12:21 AM2018-11-16T00:21:52+5:302018-11-16T00:37:02+5:30
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०१९ मध्ये होणाऱ्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. परीक्षांचा अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती आदी तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असून, आवश्यक त्यावेळी अद्ययावत करण्यात येणार आहे.
नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०१९ मध्ये होणाऱ्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. परीक्षांचा अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती आदी तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असून, आवश्यक त्यावेळी अद्ययावत करण्यात येणार आहे. अंदाजित वेळापत्रकातही बदल होण्याची शक्यता आहे. होणाºया बदलांची माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, असे उपसचिव सुनील अवताडे यांनी कळविले आहे. उमेदवारांना आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार परीक्षा द्यावी लागणार आहे.
सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा १ डिसेंबरला तर राज्य कर निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा मुख्य परीक्षा ८ डिसेंबर आणि शिक्षण सेवा गट- ब प्रशासन शाखा मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेची मुख्य परीक्षा १५ डिसेंबर २०१९ होणार आहे.
विविध विभागांच्या परीक्षांचे नियोजन
४ सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा १९ जानेवारीला तर राज्य सेवा पूर्व परीक्षा १७ फेब्रुवारीला होणार असून, मुख्य परीक्षा १३, १४ व १५ जुलैदरम्यान होणार आहे.
४ महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा २४ मार्चला, मुख्य परीक्षा संयुक्त पेपर क्रमांक एक २८ जुलै तर पोलीस उपनिरीक्षक पदासाठी पेपर क्रमांक दोन ११ आॅगस्टला आणि सहायक कक्ष अधिकारी पदासाठी मुख्य परीक्षा पेपर क्रमांक दोन २५ आॅगस्टला घेण्यात येणार आहे.
४ पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा ३१ मार्चला तर मुख्य परीक्षा ७ जुलैला होणार असून, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा ७ एप्रिलला आणि मुख्य परीक्षा १८ आॅगस्टला होणार आहे. सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा २८ एप्रिलला तर मुख्य परीक्षा १ सप्टेंबरला होणार आहे.
४ महाराष्ट्र कृषी सेवा पूर्व परीक्षा १९ मे तर मुख्य परीक्षा २९ सप्टेंबरला होणार असून, महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षा २६ मे रोजी तर मुख्य परीक्षा १५ सप्टेंबर, महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा १६ जून, महाराष्ट्र गट- क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा संयुक्त पेपर क्रमांक एक ६ आॅक्टोबरला, लिपिक टंकलेखक महाराष्ट्र गट- क सेवा मुख्य परीक्षा पेपर क्रमांक दोन १३ आॅक्टोबरला व दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र गट- क सेवा मुख्य परीक्षा पेपर क्रमांक दोन २० आॅक्टोबर आणि कर सहायक महाराष्ट्र गट- क सेवा मुख्य परीक्षा पेपर क्रमांक दोन ३ नोव्हेंबरला होणार आहे.
४ महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २३ जूनला व मुख्य परीक्षा २ नोव्हेंबरला होणार असून, महाराष्ट्र विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा परीक्षेची मुख्य परीक्षा ९ नोव्हेंबर, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २४ नोव्हेंबर आणि महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २४ नोव्हेंबरला होणार आहे.