निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 10:36 PM2020-02-12T22:36:12+5:302020-02-12T23:52:07+5:30
विशेष ग्रामसभा होऊन ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. सहा वॉर्डात अनुसूचित जाती-२, अनुसूचित जमाती -५, ओबीसी व सर्वसाधारण-१० अशा एकूण १७ जागांसाठी व एकूण सहा वॉर्डसाठी हे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
ब्राह्मणगाव : येथे विशेष ग्रामसभा होऊन ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. सहा वॉर्डात अनुसूचित जाती-२, अनुसूचित जमाती -५, ओबीसी व सर्वसाधारण-१० अशा एकूण १७ जागांसाठी व एकूण सहा वॉर्डसाठी हे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
आरक्षण जाहीर झाल्यानंतर उमेदवार चाचपणीला सुरुवात झाली आहे. सन २०२०-२०२५ साठी ग्रामपंचायतीची निवडणूक आता तोंडावर आली असून, त्यासाठी प्रभागनिहाय आरक्षण असे- प्रभाग १ मध्ये सर्वसाधारण पुरु ष १, अनुसूचित जमाती स्त्री १, सर्वसाधारण स्री १, एकूण जागा-३. प्रभाग-२ मध्ये अनुसूचित जमाती- पुरु ष १, अनुसूचित जमाती स्री १, इतर मागासवर्ग स्री १, एकूण-३. प्रभाग-३ मध्ये- सर्व साधारण पुरु ष-१, सर्वसाधारण स्री- १. एकूण-२. प्रभाग-४ मध्ये अनुसूचित जमाती पुरु ष १, इतर मागासवर्ग पुरु ष १, अनुसूचित जमाती स्री १, एकूण-३. प्रभाग-५ इतर मागासवर्ग पुरु ष १, सर्वसाधारण पुरु ष १, इतर मागासवर्ग स्री १, एकूण-३. प्रभाग-६ अनुसूचित जाती पुरु ष १, अनुसूचित जाती स्री १, इतर मागासवर्ग स्री एकूण- ३. या प्रकारे सहा प्रभागांमध्ये १७ जागांसाठी हे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. निवडणूक आरक्षण जाहीर झाल्यानंतर राजकीय चर्चेला सुरुवात झाली असून, हे आरक्षण पाहता वॉर्ड क्र. ५ हे निवडणुकीचे केंद्रबिंदू राहणार असून, उमेदवारांची संख्याही या वॉर्डात जास्त राहून निवडून प्रतिष्ठेची केली जाणार आहे.
व्यक्तिगत भेटीगाठी सुरू
वॉर्ड ५ मध्ये मागासवर्ग पुरुष १, स्री १ तसेच सर्वसाधारण १
पुरु ष असे आरक्षण आहे. उमेदवारांनी आतापासूनच भेटीगाठी घेऊन चाचपणी सुरू केली आहे. या निवडणुकीत फक्त व्यक्तिगत भेटीगाठी सुरू असून, उमेदवारांची चाचपणी होऊन मग लढत निश्चित होणार आहे. या वॉर्डाची निवडणूक प्रतिष्ठेची केली जाणार आहे.