इंजिनिअरिंग, फार्मसीची गुणवत्ता यादी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 01:07 AM2018-06-25T01:07:04+5:302018-06-25T01:07:29+5:30
इंजिनिअरिंग व फार्मसी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी आॅनलाइन अर्ज करण्याची वाढीव मुदत संपल्यानंतर रविवारी (दि.२४) अखेर व्यावसायिक शिक्षण अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे.
नाशिक : इंजिनिअरिंग व फार्मसी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी आॅनलाइन अर्ज करण्याची वाढीव मुदत संपल्यानंतर रविवारी (दि.२४) अखेर व्यावसायिक शिक्षण अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. विद्यार्थ्यांना डीटीई आणि सामाईक परीक्षा विभागाच्या संकेतस्थळावर त्यांचा लॉग इन आयडी व पासवर्ड वापरून ही गुणवत्ता यादी पाहता येणार असून, सोमवारपासून गुरुवारपर्यंत विद्यार्थ्यांना त्यांचे आॅप्शन फॉर्म भरण्याची संधी मिळणार आहे. इंजिनिअरिंग व फार्मसीसह विविध व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर २८ जूनपर्यंत पहिल्या कॅपराउडसाठी आॅनलाइन आॅप्शन फॉर्म भरता येणार आहे. त्यानुसार २९ जूनला पहिल्या कॅपराउंडसाठी जागावाटपाची यादी जाहीर होणार आहे. या यादीप्रमाणे ३० जून ते ४ जुलैच्या दरम्यान विद्यार्थ्यांना एआरसीवर (अॅडमिशन रिपोर्टिंग सेंटर) जाऊन प्रवेश निश्चित करावयाचा आहे. पहिल्या कॅपराउंडची ही प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ५ जुलैला दुसºया कॅपराउंडसाठी रिक्त जागा जाहीर होणार असून, ६ ते ८ जुुलैच्या दरम्यान विद्यार्थ्यांना दुसºया कॅपराउंडसाठी आॅप्शन फॉर्म भरता येणार आहे. यंदा सर्व व्यावसायिक अभ्यासक्र मांसाठी फ्रीज, स्लाइड व फ्लोट या केंद्रिभूत पद्धतीने प्रवेशप्रक्रि या होत असून, त्यासाठी महाविद्यालयांत सुविधा केंद्र सुरू आहेत. कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर पहिली यादी जाहीर होणार असून, कॅपराउंड १ ते ३ याप्रमाणे प्रवेश प्रक्रि या होणार आहे.
असा होईल दुसरा राउंड
६ ते ८ जुलै दुसºया कॅपराउंडसाठी आॅप्शन फॉर्म भरणे
९ जुलैला दुसºया कॅपराउंडसाठी जागा वाटपाची प्रारूप यादी
१० ते १२ जुलैदरम्यान दुसºया कॅपराउंडमध्ये पहिल्यांदाच जागा मिळालेल्या विद्यार्थ्यांना आरसी सेंटरवर संपर्क साधून प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.
१३ जुलैला दुसºया कॅपराउंडनंतर रिक्त जागा जाहीर केल्यानंतर १४ जुलैपासून तिसºया कॅपराउंडसाठी प्रक्रिया सुरू होणार आहे.