वार्षिक स्नेहसंमेलन
By Admin | Published: March 7, 2017 12:24 AM2017-03-07T00:24:17+5:302017-03-07T00:24:28+5:30
येवला : तालुक्यातील विखरणी येथील लक्ष्मी इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले.
येवला : तालुक्यातील विखरणी येथील लक्ष्मी इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले.
यानिमित्त आयोजित फेस्टिव्हलचे उद्घाटन तालुका पोलीस निरीक्षक रुपचंद वाघमारे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य अरुण थोरात होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य संजय बनकर उपस्थित होते. मान्यवराच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सांगली येथे झालेल्या राज्यस्तरीय सायकल स्पर्धेत पाचवा क्रमांक पटकाविणाऱ्या अश्विनी जालिंदर शेलार या विद्यार्थिनीचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना संजय बनकर म्हणाले की, आपल्या पाल्यावर कोणतेही संस्कार हे इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या वयात होत असतात. या वयात मनावर कोरलेले संस्कार आयुष्यभर तसेच राहतात.
दिवस उजाडण्याचा नयनरम्य देखावा स्टेजवर साकारत लक्ष्मी इंग्लिश मीडियमच्या चिमुरड्यांनी कार्यक्र मास सुरु वात केली.
शेतीवर आधारित गीते मुलांनी सादर केली. इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांचा ‘अफजल खानाचा वध’ हा ऐतिहासिक पोवाडा सादर केला. ज्युनिअर केजीच्या चिमुकल्यांनी सादर केलेले ‘खंडेरायाच्या लग्नाला’ या गीतावरील नृत्य कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. बनकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. पोलीस निरीक्षक रुपचंद वाघमारे, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील गायकवाड, संस्थापक अध्यक्ष मोहन शेलार यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्र मास कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गणपत कांदळकर, संचालक देवीदास शेळके, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष राजेंद्र गायकवाड, संत मुरलीधर बाबा पतसंस्थेचे अध्यक्ष धोंडीराम कुऱ्हाडे, सुभाष गायकवाड यांच्यासह रवींद्र शेलार, भाऊसाहेब गायकवाड, श्रावण वाघमोडे, डी. एन. कदम आदिंसह ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्याध्यापक किरण ठाकरे यांनी सूत्रसंचालन केले. वर्षा शेलार यांनी आभार मानले. मनीषा पाटील, वर्षा शेलार, तेजस्वी लासुरे, राणी कदम, कल्पना आव्हाड, ज्योती कदम, ज्योत्स्ना बत्तीसे उपस्थित होते. (वार्ताहर)