नाशकात ऑगस्टमध्येच पावसाची वार्षिक सरासरी; त्र्यंबकला विक्रमी वृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 02:36 AM2019-08-06T02:36:14+5:302019-08-06T02:36:26+5:30

२००६ नंतर पहिल्यांदाच चोवीस तासांत सुमारे १९०० मिलिमीटर पावसाची नोंद

Annual average rainfall in August in Nashik; Trimbak's record rainfall | नाशकात ऑगस्टमध्येच पावसाची वार्षिक सरासरी; त्र्यंबकला विक्रमी वृष्टी

नाशकात ऑगस्टमध्येच पावसाची वार्षिक सरासरी; त्र्यंबकला विक्रमी वृष्टी

Next

नाशिक : ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच जिल्ह्यात पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली असून, २००६ नंतर पहिल्यांदाच चोवीस तासांत सुमारे १९०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दोन जण वाहून गेले.

पावसाने सोमवारी दुपारनंतर काहीशी विश्रांती घेतल्याने जनजीवन काहीसे सुरळीत झाले. धरणांमधील विसर्गातही मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आल्याने पूरपरिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली. गोदावरी नदीत पोहण्यासाठी उतरलेला तरुण बेपत्ता झाला आहे. एकट्या त्र्यंबकेश्वरला ३९६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. २००६ मध्ये नाशिकला एका दिवसात सर्वाधिक पाऊस नोंदविला गेला होता.
सर्वच धरणांमध्ये जवळपास ६७ टक्के जलसाठा झाला आहे. सायखेडा, चांदोरी ही गोदाकाठची गावे अद्यापही पाण्याखाली आहेत.

Web Title: Annual average rainfall in August in Nashik; Trimbak's record rainfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस