एनडीसीएचा वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 12:51 AM2019-06-08T00:51:43+5:302019-06-08T00:52:13+5:30
: नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने देण्यात येणाऱ्या वार्षिक क्रीडा पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आनंद शेट्टी यांना मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला.
नाशिक : नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने देण्यात येणाऱ्या वार्षिक क्रीडा पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आनंद शेट्टी यांना मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला.
महाकवी कालिदास कलामंदिर येथे आयोजित या पुरस्कार सोहळ्यात गेल्या वर्षभरात क्रिकेटमध्ये केलेल्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर आपली छाप सोडणाºया खेळाडूंचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी आमदार सुधीर तांबे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद शहा, समीर रकटे, विलास लोणारी, हेमंत देशपांडे, योगेश हिरे आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे म्हणाले, आयुष्यात खेळाचे महत्त्व सांगताना मैदानावर घालविलेला दिवस हा भविष्यातील निरोगी आयुष्याची गुंतवणूक असते. मैदानावर मेहनत करून यश मिळविणारा खेळाडू मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या परिपक्व होत असतो. यावेळी संघटनेचे दिवंगत सहसचिव आनंद शेट्टी यांना मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार शेट्टी कुटुंबीयातील सदस्यांनी स्वीकारला.
टॅलेंट कॅम्पमधील आदित्य म्हात्रे, तनिष्क क्षत्रीय, श्रद्धा सूर्यवंशी, धीरज पांडे, देवीदास गांगुर्डे, लक्ष्य राका, निषाद मोगरे, सनी रोमाळे, समीर गायधनी, शिर्वल पवार, वरद काळे, तनिष्क चिखलीकर, फैजन शेख, ध्रुव चव्हाण, हर्ष वाघ, साई जगताप, अमन बोरसे यांच्यासह राज्याचे प्रतिनिधित्व करणाºया खेळाडूंना गौरविण्यात आले. सूत्रसंचालन मंगेश पंचाक्षरी यांनी केले.
असे आहेत पुरस्कारार्थी
शांताराम मेने (उत्कृष्ट प्रशिक्षक), प्रदीप गायधनी (उत्कृष्ट पंच), साहिल पारख आणि आयुष ठक्कर (अपकमिंग प्लेअर आॅफ दी इयर), सत्यजित बच्छाव, माया सोनवणे (प्लेअर आॅफ दी इयर), तसेच एनडीसीए स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू आर्यन सोलंकी, रितेश तिडके, तनय कुमार, अनिश राव, यशराज खाडे, तन्मय शिरोडे, शिवांश सिंग आदींनाही यावेळी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.