संजीवनी शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 11:03 PM2020-01-04T23:03:43+5:302020-01-04T23:04:38+5:30
नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या संजीवनी प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला.
सिन्नर : येथील नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या संजीवनी प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला.
संस्थेचे उपाध्यक्ष एम.जी. कुलकर्णी, उद्योजक अतुल अग्रवाल यांच्या हस्ते स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. व्यासपीठावर अध्यक्ष अनिल करवा, अधीक्षक अरुणा चोथवे, मुख्याध्यापक माया गोसावी, माधवी पंडित, सीमा देशपांडे, गीता कुलकर्णी आदींसह मान्यवर उपस्थित होते. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थिनींनी कथक करून ईशस्तवन सादर केले.
सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण जयंती, नारळी पौर्णिमा, नवरात्र, जागरण गोंधळ, गोपाळकाला, देशभक्तिपर गीते, बालगीते, नाताळ गीत आदी गीतांवर वैयक्तिक व सामूहिक नृत्य सादर करून पालकांची मने जिंकली. यानंतर झालेल्या कार्यक्रमात अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांवर मूळ संस्कार हे प्राथमिक शिक्षकच करतात. आपल्या मुलांना मोबाइल व बाह्य खाद्यपदार्थांपासून दूर ठेवण्याचा संदेश त्यांनी पालकांना दिला. शाळेतील सर्व मुले आपली आहेत असे समजून पालकांनी व शिक्षकांनी वागावे, जागरूक राहावे, स्पर्धा परीक्षांसाठी मुलांना तयार करावे, असे आवाहन कुलकर्णी केले. मुख्याध्यापक गोसावी यांनी शाळेचा वार्षिक अहवाल सादर केला. यानंतर विविध स्पर्धांमध्ये यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. ४२व्या कै. वा. श्री. पुरोहित एकांकिका स्पर्धेत शाळेने सादर केलेल्या ‘बालपण हरवलंय आमचं’ या प्रयोगातील सहभागी विद्यार्थी कलाकारांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सुनंदा नागपुरे, हिरा गोरे, मनीषा क्षत्रिय, सुरेखा भोये, नितीन ठाकरे, महेश गुंजाळ, कावेरी राऊत, सुवर्णा मते, अंजली मावलकर, संतोष गायकवाड आदींसह शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.