दाभाडीत किल्ले संवर्धन समितीचा वार्षिक स्नेहमेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:15 AM2021-02-09T04:15:52+5:302021-02-09T04:15:52+5:30
दाभाडी - छत्रपती शिवाजी महाराज गड व किल्ले संवर्धन समिती, नाशिक यांच्या दुर्ग साल्हेर, धोडप, गाळणा, अंकाई टनकाई, रामसेज ...
दाभाडी - छत्रपती शिवाजी महाराज गड व किल्ले संवर्धन समिती, नाशिक यांच्या दुर्ग साल्हेर, धोडप, गाळणा, अंकाई टनकाई, रामसेज या यशस्वी मोहिमेनंतर वार्षिक स्नेहसंमेलन श्री लॉन्स, दाभाडी येथे पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कृषिमंत्री दादा भुसे उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शेतकरी लालजी देवरे होते. कार्यक्रमाला जिल्हा सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. शैलेश निकम उपस्थित होते. यावेळी निराधार महिलांना समितीच्यावतीने साडी, पीस व पापड मशीन देण्यात आले. कौशल्य विकास योजनेत सहभागी झालेल्या ज्येष्ठ शेतकऱ्यांना प्रमाणपत्र व शेती अवजारे तसेच टोपी-उपरणे देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी भुसे यांनी गड-किल्ले संवर्धन समितीच्या कामाचे कौतुक करत पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या. कृषिमंत्री भुसे यांना शेतकरी प्रतीक म्हणून समितीच्या लहान व युवा सदस्यांच्यावतीने बैलगाडी देण्यात आली. कार्यक्रमात पुढील वर्षासाठी गड व किल्ले संवर्धन समितीचे नियोजन व पथनाट्यद्वारे जनजागृती करत सफाई अभियानाची मोहीम कशी राबवायची, याविषयी ठरविण्यात आले. यावेळी सचिव आशिष निकम, कारभारी निकम, सुरेश पवार, नामदेव आप्पा आहिरे, रावसाहेब निकम, मंगेश निकम, दीपक निकम, बापू भामरे, घनश्याम निकम, भारत निकम, अजय निकम, दिनेश महाले, रोहित निकम, भूषण निकम, गणेश साठे, शेतकरी, महिला, ज्येष्ठ पदाधिकारी, युवक व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक हरी निकम यांनी केले तर सूत्रसंचालन गड व किल्ले संवर्धन समितीचे अध्यक्ष अमोल निकम यांनी केले.