वस्तीस्तर संघाची वार्षिक सभा संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 06:16 PM2019-11-28T18:16:31+5:302019-11-28T18:17:11+5:30

येवला : महिला बचत गटांना धनादेशांचे वाटप

Annual Meeting of the homestead team held | वस्तीस्तर संघाची वार्षिक सभा संपन्न

वस्तीस्तर संघाची वार्षिक सभा संपन्न

Next
ठळक मुद्देदिल्ली येथे पैठणी प्रदर्शनासाठी सहभागी झालेल्यांना प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात आले

येवला : महिला आर्थिक विकास महामंडळ नाशिक व येवले नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत स्थापित वस्तीस्तर संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा महात्मा फुले नाट्यगृह येथे संपन्न झाली. यावेळी महिला बचत गटांना धनादेशांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्र मास प्रमुख पाहुणे म्हणून उपनगराध्यक्ष सुरज पटनी, नगरसेवक रु पेश लोणारी, नगरसेविका सरोजनी वखारे, परवीन निसार शेख, छाया बंडू क्षीरसागर, निसार शेख, बँक आॅफ बरोडाचे शाखा व्यवस्थापक राहुल शेळके, देना बँकेचे शाखा व्यवस्थापक दत्तात्रेय जाधव उपस्थित होते. सभेत मान्यवरांचे हस्ते ‘हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची’ या तालुकास्तरीय स्पर्धेतील विजेते ओम गुरु देव, एस.एस. के, मुक्तीभूमी, अजमेरा, विघ्नहर्ता, गुरु माऊली या महिला बचत गटांना ५० हजार रु पयांचे धनादेश वितरित करण्यात आले. तसेच याच स्पर्धेत जिल्हास्तरावर निवड झालेल्या अजमेरा गटाला २ लाखाचे पारितोषिक मिळाले होते. त्या धनादेशाचे देखील मान्यवरांचे हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी ६ गटांचे सत्कार करण्यात आले. तसेच १६ महिला बचत गटांना फिरता निधी वाटप करण्यात आला. दिल्ली येथे पैठणी प्रदर्शनासाठी सहभागी झालेल्यांना प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात आले.

Web Title: Annual Meeting of the homestead team held

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक