वस्तीस्तर संघाची वार्षिक सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 09:21 PM2019-11-28T21:21:44+5:302019-11-28T21:28:25+5:30

येवला : महिला आर्थिक विकास महामंडळ, नाशिक व येवला नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानअंतर्गत स्थापित वस्तीस्तर संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा महात्मा फुले नाट्यगृह येथे झाली. यावेळी महिला बचतगटांना धनादेशांचे वितरण करण्यात आले.

Annual Meeting of the homesteading team | वस्तीस्तर संघाची वार्षिक सभा

महिला बचतगटांना धनादेशाचे वाटप करताना उपनगराध्यक्ष सूरज पटणी. समवेत मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, सूरज पटणी, रु पेश लोणारी, सरोजनी वखारे, परवीन निसार शेख, छाया बंडू क्षीरसागर, निसार शेख, राहुल शेळके, दत्तात्रेय जाधव आदी़

googlenewsNext
ठळक मुद्देयेवला : महिला बचतगटांना धनादेशांचे वाटप

लोकमत न्यूज नेटवर्क
येवला : महिला आर्थिक विकास महामंडळ, नाशिक व येवला नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानअंतर्गत स्थापित वस्तीस्तर संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा महात्मा फुले नाट्यगृह येथे झाली. यावेळी महिला बचतगटांना धनादेशांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपनगराध्यक्ष सूरज पटणी, नगरसेवक रूपेश लोणारी, नगरसेवक सरोजिनी वखारे, परवीन निसार शेख, छाया बंडू क्षीरसागर, निसार शेख, बँक आॅफ बरोडाचे शाखा व्यवस्थापक राहुल शेळके, देना बँकेचे शाखा व्यवस्थापक दत्तात्रेय जाधव उपस्थित होते. सभेत मान्यवरांच्या हस्ते ‘हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची’ या तालुकास्तरीय स्पर्धेतील विजेते ओम गुरुदेव, एसएसके, मुक्तिभूमी, अजमेरा, विघ्नहर्ता, गुरुमाउली या महिला बचतगटांना ५० हजारांचे धनादेश वितरित करण्यात आले. तसेच याच स्पर्धेत जिल्हास्तरावर निवड झालेल्या अजमेरा गटाला दोन लाखांचे पारितोषिक मिळाले होते. त्या धनादेशाचेदेखील मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी सहा गटांचे सत्कार करण्यात आले. तसेच १६ महिला बचतगटांना फिरता निधी वाटप करण्यात आला. दिल्ली येथे पैठणी प्रदर्शनासाठी सहभागी झालेल्यांना प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
नगरपालिकेचे सहायक प्रकल्प अधिकारी शंतनू वक्ते यांनी प्रास्ताविक केले. गौतमी लो संचलित साधन केंद्र निफाडच्या व्यवस्थापक प्रतिभा घंगाळे यांनी महिलांना मार्गदर्शन केले. समाजसेवक निसार शेख, माजी नगराध्यक्ष राजश्री पहिलवान, माया बगदणे, शिल्पा भावसार, वैशाली भावसार यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन संदीप बोढरे यांनी केले.

Web Title: Annual Meeting of the homesteading team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.