क्रांतिवीर नाईक पतसंस्थेची वार्षिक सभा

By admin | Published: September 27, 2016 11:23 PM2016-09-27T23:23:07+5:302016-09-27T23:24:44+5:30

नांदूरशिंगोटे : गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Annual meeting of Krantiveer Naik Credit Society | क्रांतिवीर नाईक पतसंस्थेची वार्षिक सभा

क्रांतिवीर नाईक पतसंस्थेची वार्षिक सभा

Next

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील क्रांतिवीर वसंतराव नाईक पतसंस्थेची १३वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करून त्यास मंजुरी देण्यात आली. संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व विविध क्षेत्रात उल्लेखणीय कामगिरी केलेल्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्र घुले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत संस्थापक प्रारब्ध खंडेराव शेळके यांनी अहवाल सादर करताना संस्थेला सन २०१५-१६ या वर्षात दहा लाख ५१ हजार रुपयांचा नफा झाल्याची माहिती दिली. संस्थेची सभासद संख्या १२२९, वसूल भागभांडवल २७ लाख ७५ हजार, स्वनिधी ७१.५३ लाख इतका आहे. सात कोटी ५७ लाख रुपयांच्या ठेवी आहेत. संस्थेने तीन कोटी ३६ लाख रुपयांची गुंतवणूक केली असून, वर्षअखेर पाच कोटी इतके कर्ज येणे आहे. खेळते भागभांडवल आठ कोटी ९९ लाख असून, संस्थेची उलाढाल ७० कोटी असल्याची माहिती दिली.
उपाध्यक्ष संदीप भाबड यांनी संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध केल्याबद्दल सर्व सभासदांचे आभार मानले. यावेळी वावी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक रणजित आंधले, जगन्नाथ कुटे, भारत मुंगसे, डॉ. सुभाष गोसावी, जगन्नाथ भाबड, जगन्नाथ खैरनार, बाळासाहेब बोडके, मारुती शेळके, प्रकाश पवार, अनिल नवले, देवराम गिऱ्हे, नजीर शेख आदिंना क्रांतिवीर वसंतराव नाईक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सभासद पाल्यांचाही यावेळी गुणगौरव करण्यात आला.
यावेळी संचालक लक्ष्मणराव शेळके, डॉ. राधाकृष्ण सांगळे, अनिल नवले, डी. टी. भाबड, संजय शेळके, कैलास बर्के, सुनील मुंडे, देवराम आगिवले, बाळासाहेब आव्हाड, निवृत्ती शेळके, भाऊपाटील शेळके, जनाबाई भाबड, श्रेया शेळके आदींसह सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते. बाळासाहेब आव्हाड यांनी सूत्रसंचालन केले. संतोष गाडेकर यांनी आभार मानले. (वार्ताहर)
 

Web Title: Annual meeting of Krantiveer Naik Credit Society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.