येवला महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 10:49 PM2020-02-14T22:49:40+5:302020-02-15T00:14:38+5:30
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोबाइलचा बळी न होता साहित्याला आपला भाव विषय बनवून त्यातून जीवनमूल्य घ्यावेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. गो. तु. पाटील यांनी केले.
येवला : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोबाइलचा बळी न होता साहित्याला आपला भाव विषय बनवून त्यातून जीवनमूल्य घ्यावेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. गो. तु. पाटील यांनी केले.
येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी प्रसिद्ध कवी तुकाराम धांडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे, उपप्राचार्य प्रा. शिवाजी गायकवाड, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य सुशील गुजराथी, अॅड. माणिकराव शिंदे, सुरेश सानप व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी तुकाराम धांडे यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत निसर्गाच्या कविता सादर केल्या. तसेच कवितेच्या निर्मितीसंदर्भात अनुभव कथन केले. प्रा. डॉ. जी.जे. भामरे व प्रा. डी.के. कन्नोर यांनी सूत्रसंचालन केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. के. के. बच्छाव यांनी करून दिला, तर डॉ. मनीषा गायकवाड यांनी आभार मानले. याप्रसंगी लेखापाल अजय सोमानी यांच्याकडून वाणिज्य शाखेतील वैष्णवी मारवाडी या प्रथम आलेल्या विद्यार्थिनीस रुपये एक हजार रोख व प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे यांचे वडील कै. विठ्ठलराव गमे यांच्या स्मरणार्थ कैलास गायकवाड यास मराठी विषयात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच क्रीडा विभागातील राष्ट्रीय पातळीवर खेळलेल्या खेळाडू प्रतीक्षा बिल्लाडे, कांचन जोशी, यशवंती गुप्ता, पूजा काळे, रोहन लोणारी, रोहन परदेशी व दर्शन ताठे यांचाही गौरव करण्यात आला. प्रा. शारदा अहिरे, राजेंद्र सौंदाणे आदींनी परिश्रम घेतले.