एचएएल हायस्कूल मराठी माध्यमचा वार्षिक पारितोषिक वितरण उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 05:59 PM2019-12-23T17:59:47+5:302019-12-23T18:00:31+5:30
ओझर टाऊनशिप : येथील एचएएल हायस्कूल (मराटी माध्यम) चा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ दिमाखात संपन्न झाला.
ओझर टाऊनशिप : येथील एचएएल हायस्कूल (मराटी माध्यम) चा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ दिमाखात संपन्न झाला.
शाळेच्या हॉलमध्ये झालेल्या कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. मो. स. गोसावी तर प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय सचिव राम कुलकर्णी, ओझर झोनचे अधिक्षक प्राचार्य डॉ. एस. आर. खंडेलवाल, एचएएल इंग्रजी माध्यमाचे प्राचार्य के. एन. पाटील हे उपस्थीत होते.
प्रारंभी विद्यार्थी गीतमंचने सोसायटी गीत, स्वागत गीत म्हटले मान्यवरांचे हस्ते सरस्वती पुजन करण्यात आले. मुख्याध्यापक श्रीमती एस. पी. गाजरे यांनी मान्यवरांचा परिचय करून देत अहवाल वाचन केले. त्यानंतर शाळेतील मुलामुलींनी तयार केलेले हस्तलिखित ‘उंच माझा झोका’चे डॉ. गोसावी यांचे हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी राम कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. मो.स. गोसावी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातुन विद्यार्थ्यांना संस्थेचा इतिहास कथन करून, विद्यार्थ्यांमध्ये प्रत्येक गोष्टीबद्दल कुतूहल अनुबंध आवड, इर्षा असावी असे विचार असावेत मांडले. मान्यवरांच्या हस्ते प्रत्येक इयत्तेतील प्रथम क्र मांक प्राप्त विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.
माजी विद्यार्थी खैरनार व सौ. खेरनार यांनी या वर्षापासून इयत्ता १० वीत प्रथम येणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थीनीस प्रत्येकी फिरती ढाल, चषक व रोख १००१ रुपयांचे बक्षीस जाहिर करून ते मान्यवरांच्या हस्ते दिले. कार्यक्र मासाठी पालक, शिक्षक उपस्थित. होते
एन. एम. जाधव यांनी सुत्रसंचालन तर पर्यवेक्षक एम. एस. मोकळ यांनी आभार मानले.