इस्कॉन मंदिरात एक टन पुष्पांचा अभिषेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 12:38 AM2019-03-24T00:38:16+5:302019-03-24T00:38:31+5:30

जनरल वैद्यनगरमधील वृंदावन कॉलनीतील इस्कॉनच्या श्री श्री राधा-मदनगोपाल मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठेला आठ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल तीनदिवसीय प्राणप्रतिष्ठा महोत्सव साजरा करण्यात येत असून,

 Anointing of one ton of flowers at the ISKCON temple | इस्कॉन मंदिरात एक टन पुष्पांचा अभिषेक

इस्कॉन मंदिरात एक टन पुष्पांचा अभिषेक

googlenewsNext

नाशिक : जनरल वैद्यनगरमधील वृंदावन कॉलनीतील इस्कॉनच्या श्री श्री राधा-मदनगोपाल मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठेला आठ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल तीनदिवसीय प्राणप्रतिष्ठा महोत्सव साजरा करण्यात येत असून, यात शनिवारी (दि. २३) सायंकाळी मूर्तींना पुष्पांची आकर्षक सजावट करून एक टन गुलाबपुष्पांच्या पाकळ्यांचा अभिषेक करण्यात आला. तसेच यानिमित्त दिवसभर भजन, कीर्तन, प्रवचन या धार्मिक कार्यक्रमांसह सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले.  जगभरात हरे कृष्णभक्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या इस्कॉन या धार्मिक संस्थेच्या वतीने नाशिक येथे आठ वर्षांपूर्वी वृंदावन कॉलनीत श्री श्री राधा मदनगोपाल मंदिराची स्थापना करण्यात आली. यानिमित्त दरवर्षी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.

Web Title:  Anointing of one ton of flowers at the ISKCON temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.