शहरात आणखी १३५ ऑक्सिजन बेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:11 AM2021-03-30T04:11:31+5:302021-03-30T04:11:31+5:30

नाशिक - शहरात काेरोनाबाधितांची संख्या वाढत असताना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर्स बेड मिळत नसल्याची ओरड होत आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने ...

Another 135 oxygen beds in the city | शहरात आणखी १३५ ऑक्सिजन बेड

शहरात आणखी १३५ ऑक्सिजन बेड

Next

नाशिक - शहरात काेरोनाबाधितांची संख्या वाढत असताना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर्स बेड मिळत नसल्याची ओरड होत आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने आणखी काही खासगी रुग्णालयांशी चर्चा करून ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर्स बेड उपलब्ध करून दिले आहेत. एकूण १३५ व्हेंटिलेटर्स आणि ऑक्सिजन बेड्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. शनिवारपाठोपाठ सोमवारीदेखील आयुक्तांनी बेड वाढविल्याने तीन दिवसांत ६३९ बेड उपलब्ध झाले आहेत. शहरात गेल्या महिन्यापासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. या महिन्यात तर रोजच बाधितांच्या संख्येचा उच्चांक होत आहे. एकीकडे रुग्ण वाढत असताना दुसरीकडे मात्र महापालिका किंवा खासगी रुग्णालयात ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटर्सचे बेडच उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी आहेत. शहरात खासगी व महापालिकेच्या मिळून १२८३ ऑक्सिजन बेड तसेच ५३७ आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेड आहेत. शहरातील मेाजक्याच रुग्णालयांत दाखल होण्यावर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांचा भर असल्याने उपनगरातील छोट्या रुग्णालयातील बेड मात्र रिकामे होते. त्यांच्याशी चर्चा करून आयुक्तांनी ५०४ बेड्स शनिवारी (दि. २७ मार्च) उपलब्ध करून दिले.

सोमवारी महापालिका आयुक्तांनी बिटकोसह खासगी रुग्णालये मिळून जवळपास १३५ ऑक्सिजन बेड उपलब्ध करून दिले आहेत. येत्या दोन दिवसांत न्यू बिटको रुग्णालयात आणखी शंभर ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्यामुळे रुग्णांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे.

Web Title: Another 135 oxygen beds in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.