खासगी रूग्णालयांसाठी आणखी १७५ बेडस राखीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:15 AM2021-04-04T04:15:43+5:302021-04-04T04:15:43+5:30
शहरात कोरोना बाधीतांची संख्या वाढत असून महापालिकेने उचित नियोजन करून देखील बेडस उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. ...
शहरात कोरोना बाधीतांची संख्या वाढत असून महापालिकेने उचित नियोजन करून देखील बेडस उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी हे बेडस उपलब्ध करून दिले आहेत. यात कृष्णा हॉस्पीटल, पंचवटी येथे २२ बेडस, समर्थ हॉस्पीटल, पाथर्डी फाटा येथे १८ बेडस तर कृष्णा हॉस्पीटल, कॅनडा कॉर्नर,सुयोग चाईल्ड सेंटर, कॅनडा कॉर्नर, सातपुर येथील जीवनज्योत हाॅस्पीटल तसेच कलावती हॉस्पीटल, मुंबई नाका येथील सिध्दी हॉस्पीटल, कामटवाडे येथील अंकुर मॅटर्निटी, मुंबई नाका येथील एचएसजी मानवता कॅन्सर सेंटर युनीट, मुंबई नाका या सर्व रूग्णालयात प्रत्येकी १५ बेडस उपलब्ध आहेत. सिडकोतील सोमाणी हॉस्पीटल, चुंचाळे येथील श्री तुळजा भवानी हॉस्पीटल याठिकाणी प्रत्येकी दहा बेडस उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे या १७५ बेडस पैकी १५ आयसीयु बेड, १२७ ऑक्सीजन बेड आणि ३३ व्हेंटीलेटर्स बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत.