गंभीर कोरोना रुग्णांसाठी आणखी ५०४ ऑक्सिजन बेड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:15 AM2021-03-28T04:15:14+5:302021-03-28T04:15:14+5:30
नाशिक - शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून त्यातच गंभीर रुग्णांसाठी ऑक्सिजन बेडसदेखील उपलब्ध होत नसल्याने त्यांचे कुटुंबीय हवालदिल झाले ...
नाशिक - शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून त्यातच गंभीर रुग्णांसाठी ऑक्सिजन बेडसदेखील उपलब्ध होत नसल्याने त्यांचे कुटुंबीय हवालदिल झाले दिसत आहेत. त्यामुळे महापालिकेने आणखी २३ रुग्णालयांत मिळून ५०४ ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर्स बेड उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय हेाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी शनिवारी दिली.
गेल्या मार्चच्या प्रारंभापासून जिल्ह्यात कोराेनाबाधितांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. त्यातच नाशिकच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रातदेखील कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने धुळे, जळगाव, नंदूरबार येथील रुग्णदेखील मोठ्या संख्येने नाशिक शहरात उपचारासाठी येत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा शासकीय आणि खासगी रुग्णालयांवरील ताण वाढला आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर्स असलेले बेडस्च मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.
नाशिक शहरातील सध्या १२८१ ऑक्सिजन बेडस्, तर ५३७ व्हेंटिलेटर्सचे बेड उपलब्ध आहेत. मात्र असे असतानादेखील ऑक्सिजनचे बेडस मिळत नसल्याने रुग्णांच्या नातेवाइकांना हॉस्पिटल शोधण्याची वेळ येत आहे. त्यामुळे महापालिकेने आता आणखी २३ रुग्णालयांमध्ये ३९५ ऑक्सिजन आणि ६८ व्हेंटीलेटर्स बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याच सर्व रुग्णालयांत मिळून आणखी ४१ अतिदक्षता विभागात बेडसदेखील असून त्यामुळे रुग्णांना मोठी मदत हेाणार आहे.
इन्फो...
रुग्णालय ऑक्सिजन बेड व्हेंटीलेटर बेड
चोपडा हॉस्पिटल १६ ४
साई वुमन्स, मुंबई नाका ९ ३
श्री व्यंकटेश हॉस्पिटल इंदिरानगर १२ ३
मयूर हॉस्पिटल कामटवाडे २६ ४
नवसंजीवनी हॉस्पिटल मुंबई नाका ५ ५
सिद्धी हॉस्पिटल सातपूर २६ २
सिल्व्हर हॉस्पिटल सातपूर ७ २
साफल्य हॉस्पिटल गंगापूर रोड १० ३
जीवक मॅटर्निटी पंचवटी १७ ७
नाशिक रोड हॉस्पिटल १३ ३
सिद्धी विनायक गंगापूर रोड १८ ४
सनराईज हॉस्पिटल, शरणपूर रोड २४ ५
सहारा हाॅस्पिटल, नाशिक रोड ११ ७
तिरूपती हॉस्पिटल, सिडको १७ १
सुयश हॉस्पिटल मुंबई नाका २७ १०
विजन हॉस्पिटल कॉलेज रोड २० ५
स्पर्श हॉस्पिटल मुंबई नाका १० ०
समर्थ हॉस्पिटल पंचवटी २० ०
श्री पंचवटी कोविड हॉस्पिटल १३ ०
न्यु मॅट्रिक्स हॉस्पिटल, इंदिरानगर १५ ०
सुजाता बिर्ला हॉस्पिटल २५ ०
साई सेवा हॉस्पिटल,अंबड ३४ ०
न्यू आधार हॉस्पिटल द्वारका २० ०