भाजपला आणखी एक धक्का माजी सभागृह नेते दिनकर पाटील शिवसेनेच्या दिशेने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:11 AM2021-01-09T04:11:48+5:302021-01-09T04:11:48+5:30
मात्र, पाटील हे भाजपा सोडण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा गेल्या वर्षभरापासून आहे. त्यामुळे गीते-बागुल यांच्यापाठोपाठ आता पाटीलही भाजपला रामराम ठोकणार ...
मात्र, पाटील हे भाजपा सोडण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा गेल्या वर्षभरापासून आहे. त्यामुळे गीते-बागुल यांच्यापाठोपाठ आता पाटीलही भाजपला रामराम ठोकणार असल्याचे वृत्त आहे
मुळात काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि माजी शहराध्यक्ष राहिलेले दिनकर पाटील हे बहुजन समाज पार्टीसह अनेक पक्ष फिरून भाजपमध्ये आले आहेत. २०१७ मध्ये झालेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये त्यांच्या प्रभागात भाजपचे चारी सदस्य नगरसेवक त्यांनी निवडून आणले. मनपातील कामकाजाचा दांडगा अनुभव असल्याने त्यांना भाजपने सभागृहनेतेपदही दिले. स्थायी समितीवर सदस्य म्हणूनही दोन वर्षांचा कार्यकाळ त्यांनी पूर्ण केला आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या निवड महापौरपदाच्या निवडणुकीत प्रबळ दावेदार असलेल्या पाटील यांना भाजपने उमेदवारी नाकारल्याने ते अस्वस्थ झाले होते. त्या आधी अशाच प्रकारे विधानसभेच्या निवडणुकीत नाशिक पश्चिम मतदार संघातही उमेदवारी देताना डावलण्यात आले होते. त्याची परतफेड महापौर पदाच्या निवडणुकीत केली जाईल, असे सांगितले जात असताना, प्रत्यक्षात मात्र तेथेही नाकारण्यात आल्याने पाटील नाराज होते. यातूनच ते आता शिवबंधन बांधणार असल्याची चर्चा रंगली आहे.