नाशिकमधील निलंबित नायब तहसीलदाराला आणखी एक दणका; संशयितांच्या यादीत समावेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 11:54 IST2025-02-19T11:54:31+5:302025-02-19T11:54:54+5:30
प्रकरणात निलंबित तहसीलदार संदीप धारणकर यांचा संशयित आरोपींच्या यादीत समावेश करण्यात आला.

नाशिकमधील निलंबित नायब तहसीलदाराला आणखी एक दणका; संशयितांच्या यादीत समावेश
Nashik Crime: छावणी पोलिसात दाखल बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्म दाखले वाटप केल्याच्या प्रकरणात दहावा संशयित म्हणून निलंबित नायब तहसीलदारांचा समावेश केल्याची माहिती पोलिस निरीक्षक डी.डी. जाधव यांनी दिली.
नाशिक शहरात बांगलादेशींना जन्म दाखल्याद्वारे भारतीय बनवण्याचे षडयंत्र सुरु असल्याचा आरोप झाल्यानंतर या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीची नियुक्ती झाली आहे. तहसीलदार विशाल सोनवणे यांनी याबाबतची तक्रार दिली होती. मंगळवारी या प्रकरणात निलंबित तहसीलदार संदीप धारणकर यांचा संशयित आरोपींच्या यादीत समावेश करण्यात आला.
पोलिसांच्या अहवालात नायब तहसीलदार धारणकर यांना फरार दाखविण्यात आल्याची माहिती आहे. सदर प्रकरणात राज्यशासनाने तत्कालीन तहसीलदार नितीनकुमार देवरे यांच्यासह नायब तहसीलदार धारणकर यांच्या निलंबनाचे आदेश दिले होते. संशयितांच्या यादीतही नायब तहसीलदारांचा समावेश झाल्याने अधिकारीवर्गाचे धाबे दणाणले आहे.
दरम्यान, डिफेन्स कमिटीचे आसीफ शेख व मुस्तकीन डिग्निटी यांनी एसआयटी पथक तपासात भेदभाव करत असल्याचा आरोप केला आहे. जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी काही दिवसांपूर्वी त्यांनी केला होती.