अजून एक कोरोनामुक्त घरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 11:16 PM2020-04-20T23:16:26+5:302020-04-20T23:16:37+5:30

नाशिक शहरातील पहिला कोरोनाबाधित रुग्ण ठरलेल्या गोविंदनगरच्या नागरिकाला कोरोनामुक्तीनंतर सर्व तांत्रिक बाबींच्या पूर्ततेसह सोमवारी सायंकाळी जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. नाशिक शहरातील पहिला, तर जिल्ह्यातील दुसरा कोरोनाबाधित रुग्ण पूर्णपणे बरा झाल्याने त्याला जिल्हा रुग्णालयातून अत्यंत उत्साहाच्या वातावरणात अ‍ॅम्ब्युलन्सद्वारे घरी सोडण्यात आले.

Another Coronet Free Home! | अजून एक कोरोनामुक्त घरी!

अजून एक कोरोनामुक्त घरी!

Next
ठळक मुद्देदिलासा : महानगरातील पहिल्या बाधित रुग्णाला जिल्हा रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

नाशिक : नाशिक शहरातील पहिला कोरोनाबाधित रुग्ण ठरलेल्या गोविंदनगरच्या नागरिकाला कोरोनामुक्तीनंतर सर्व तांत्रिक बाबींच्या पूर्ततेसह सोमवारी सायंकाळी जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. नाशिक शहरातील पहिला, तर जिल्ह्यातील दुसरा कोरोनाबाधित रुग्ण पूर्णपणे बरा झाल्याने त्याला जिल्हा रुग्णालयातून अत्यंत उत्साहाच्या वातावरणात अ‍ॅम्ब्युलन्सद्वारे घरी सोडण्यात आले.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, डॉ. अजिता साळुंखे यांच्यासह सिव्हिलचे सर्व प्रमुख डॉक्टर्स, नर्सेस, सहायक कर्मचारी यांच्या उपस्थितीत त्या कोरोनामुक्त रुग्णाला अत्यंत जल्लोषात टाळ्यांच्या कडकडाटात निरोप देण्यात आला.
गोविंदनगर येथील हा रुग्ण दिल्ली येथे जाऊन आला असल्याने ४ एप्रिलला जिल्हा रुग्णालयात दाखल झाला होता. त्याच्या घशातील स्रावाची चाचणी केल्यानंतर ६ एप्रिल रोजी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. हा महानगरपालिका क्षेत्रातील पहिला कोरोनाबाधित रु ग्ण ठरला होता. तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने या रु ग्णावर योग्य उपचार करून त्याला कोरोनामुक्त करण्यात यश मिळवले. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम असून, जिल्हा सामान्य
रुग्णालयातील डॉक्टरांचा चमू, परिचारिका, वॉर्डबॉय आदींसह इतर आरोग्य कर्मचारी खूप परिश्रम घेत आहेत.
जिल्ह्यातील सर्व रुग्णांची प्रकृती सुधारत असून, नाशिक शहरासह मालेगाव येथे उपचार घेत असलेले सर्व कोरोना रु ग्णही या रुग्णाप्रमाणेच लवकर बरे होतील, असा विश्वासही जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी यावेळी व्यक्त केला. नाशिक जिल्ह्यात रुग्णांची संख्या सतत वाढत असल्याने आपल्या सर्वांची जबाबदारी वाढली असून, कुठल्याही व्यक्तीला रु ग्णालयात येण्याची वेळ येऊ नये यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन करू नये, असे आवाहनही डॉ. जगदाळे यांनी यावेळी केले.
निफाड तालुक्यातील पिंपळगाव नजीक येथील रु ग्ण २५ मार्चला जिल्हा रु ग्णालयात दाखल झाला होता. सिव्हिलमधील तज्ज्ञ डॉक्टर्सनी राज्य आणि केंद्र शासनाच्या निर्देशानुसार अत्यंत प्रभावीपणे त्याच्यावर उपचार केले. त्या सर्व बाबींचा परिणाम म्हणूनच जिल्ह्यातील पहिला पॉझिटिव्ह
रुग्ण पूर्णपणे बरा झाल्याची
घोषणा गत रविवारी करण्यात
आली होती. त्यानंतर आठवडाभरातच दुसरा कोरोना रुग्णदेखील कोरोनामुक्त होऊन घरी सोडण्यात आला आहे.
सिव्हिलच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केलेल्या अथक सेवेने मला मानसिकरीत्यादेखील सक्षम केले. तसेच या आजारावर आपण मात करू शकू, असा विश्वासदेखील दिला. त्यामुळेच आज आपण कोरोनाविरुद्धची दुसरी लढाई जिंकू शकलो आहे. या आनंदाचे श्रेय हे संपूर्ण आरोग्य यंत्रणेला आहे. देशाला कोरोनामुक्त करण्यासाठी नागरिकांनी डॉक्टरांसह प्रशासन आणि पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही कोरोनामुक्त रु ग्णाने यावेळी नागरिकांना केले.

Web Title: Another Coronet Free Home!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.