जिल्ह्यात आणखी एका शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 01:11 AM2019-06-08T01:11:18+5:302019-06-08T01:12:27+5:30
जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येची आणखी एक घटना समोर आली असून, पेठ तालुक्यातील मौजे जांभूळपाडा येथील ७२ वर्षीय शेतकºयाने गळफास घेऊन आत्महत्या केली. बाबूराव महादू कुवर असे आत्महत्या केलेल्या शेतकºयाचे नाव असून पेठ तालुक्यातील शेतकरी आत्महत्येची ही पहिलीच घटना आहे.
नाशिक : जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येची आणखी एक घटना समोर आली असून, पेठ तालुक्यातील मौजे जांभूळपाडा येथील ७२ वर्षीय शेतकºयाने गळफास घेऊन आत्महत्या केली. बाबूराव महादू कुवर असे आत्महत्या केलेल्या शेतकºयाचे नाव असून पेठ तालुक्यातील शेतकरी आत्महत्येची ही पहिलीच घटना आहे. दरम्यान, आत्महत्येचे निश्चित कारण अद्याप स्पष्ट झाले नसून या संदर्भातील चौकशीनंतर आत्महत्येविषयीचा उलगडा होणार आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची संख्या ३४ इतकी झाली आहे.
पेठ तालक्यातील मौजे जांभूळपाडा येथील रहिवासी असलेल्या बाबूराव कुवर यांनी शुक्रवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप स्पष्ट नसल्याने याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाºयांना सादर करण्यात आलेला आहे. कुवर यांना पक्षघाताचा झटका आल्यामुळेदेखील ते नैराश्यात होते. याबरोबरच दुष्काळ किंवा त्यांच्यावर काही कर्ज होते का याचीदेखील माहिती जिल्हा प्रशासनाकडून घेतली जात आहे.
पेठ येथील शेतकºयाने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली याचे कारण चौकशी अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.
११ तालुक्यांत आत्महत्या
जिल्ह्यात गेल्या वर्षी एकाच दिवसात तीन, तर यंदा जानेवारीत दोन शेतकºयांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या होत्या. गेल्यावर्षी मे अखेरपर्र्यंत आत्महत्या केलेल्या शेतकºयांची ३९ इतकी होती. जिल्ह्यातील ११ तालुक्यांमध्ये आत्महत्या केलेल्या शेतकºयांची नोंद करण्यात आली असून, मे अखेरपर्यंत निरंक असलेल्या पेठ तालुक्यातील ही पहिलीच आत्महत्या आहे. गेल्यावर्षी ७० वर्षांहून अधिक वय असलेल्या आत्महत्या केलेल्या शेतकºयांची संख्या तीन इतकी होती.