नेहेरूनगर येथे आणखी एक शासकीय कोविड रुग्णालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:23 AM2021-05-05T04:23:03+5:302021-05-05T04:23:03+5:30

नाशिक- शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच आता तिसरी लाट येण्याची देखील शक्यता व्यक्त केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी ...

Another Government Kovid Hospital at Nehru Nagar | नेहेरूनगर येथे आणखी एक शासकीय कोविड रुग्णालय

नेहेरूनगर येथे आणखी एक शासकीय कोविड रुग्णालय

Next

नाशिक- शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच आता तिसरी लाट येण्याची देखील शक्यता व्यक्त केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि.३) महापौर सतीश कुलकर्णी, खासदार हेमंत गोडसे तसेच आयुक्त कैलास जाधव यांनी पाहणी केली.

इंडिया सिक्युरिटी प्रेसचे हॉस्पिटल हे पूर्ण क्षमतेने कार्यान्वित नसून प्राथमिक सुधारणा म्हणजेच इमारतीस डागडुजी, रंगरंगोटी, स्वच्छता अशाप्रकारच्या सुधारणा. महानगरपालिकेच्या माध्यमातून केल्यास त्याठिकाणी किमान शंभर बेडचे कोविड हॉस्पिटल तयार होऊ शकते, असे महापौर सतीश कुलकर्णी यांनी पाहणीनंतर सांगितले. शहरातील बिटको, झाकीर हुसेन हॉस्पिटल, सिव्हिल हॉस्पिटल, मविप्रचे हॉस्पिटल याव्यतिरिक्त रुग्णांच्या सेवेसाठी हे रुग्णालय तयार झाल्यास शहरातील रुग्णांना जीवनदायी ठरणार असल्याचेही महापौर कुलकर्णी यांनी सांगितले.

नाशिकमध्ये सध्या असलेली शासकीय रुग्णालये कमी पडत आहेत. त्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय वर्गाला उपचारासाठी आणखी एक रुग्णालय उपलब्ध करावे, यासाठी या पाहणी दौऱ्यापूर्वी खासदार भारती पवार, आमदार सीमा हिरे, राहुल ढिकले, भाजपा शहराध्यक्ष गिरीश पालवे, सभागृह नेते सतीश सोनवणे, भाजप गटनेते जगदीश पाटील, माजी उपमहापौर ॲड. मनीष बस्ते, गुलाम शेख, नगरसेवक प्रशांत जाधव, माजी नगरसेवक ॲड. तानाजी जायभावे, गणेश उन्हवणे, कॉ. राजू देसले, जगदीश गोडसे यांच्या उपस्थितीत आयुक्तांच्या दालनात बैठक झाली. यावेळी झालेल्या चर्चेनुसार कोरोनाची संभाव्य तिसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेता पूर्वतयारीचा भाग म्हणून इंडिया सिक्युरिटी प्रेसचे नेहरूनगर रुग्णालय कोविड हॉस्पिटल म्हणून कार्यान्वित करण्याबाबत चर्चा झाली. त्यानुसार महापौर सतीश कुलकर्णी यांनी आयुक्तांसमवेत पदाधिकाऱ्यांसह हॉस्पिटलची समक्ष पाहणीही करण्यात आली.

छायाचित्र आर फोटोवर ०३ नेहेरू नगर

Web Title: Another Government Kovid Hospital at Nehru Nagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.