अन् दीड महिन्यानंतर घडले वीजेचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 10:40 PM2020-08-07T22:40:53+5:302020-08-08T01:05:28+5:30
परिसरातील बोरीचीवाडी येथील ट्रान्सफार्मरमध्ये बिघाड होऊन नादुरु स्त झाला होता. लॉकडाऊनमध्ये काहीशा सुस्त झालेल्या विद्युत मंडळाच्या ढिसाळ कारभाराला नागरिक चांगलेच वैतागले होते. दीड महिन्यापासून देवगाव येथील बोरीचीवाडीत काळोख दाटल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच जागे झालेल्या महावितरण विभागाने ट्रान्सफार्मर दुरुस्त केला आणि नागरिकांना वीजेचे दर्शन घडले.
देवगाव : परिसरातील बोरीचीवाडी येथील ट्रान्सफार्मरमध्ये बिघाड होऊन नादुरु स्त झाला होता. लॉकडाऊनमध्ये काहीशा सुस्त झालेल्या विद्युत मंडळाच्या ढिसाळ कारभाराला नागरिक चांगलेच वैतागले होते. दीड महिन्यापासून देवगाव येथील बोरीचीवाडीत काळोख दाटल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच जागे झालेल्या महावितरण विभागाने ट्रान्सफार्मर दुरुस्त केला आणि नागरिकांना वीजेचे दर्शन घडले.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बोरीचीवाडी येथील नागरिकांना विजेच्या समस्येने ग्रासले होते. वारंवार तक्रार करूनही विद्युत मंडळानी दखल घेतली नाही. दोन आठवड्यांपूर्वी टाके हर्षे येथील निर्गुडपाड्याचा ट्रान्सफार्मर विजेच्या कमी जास्त दाबामूळे जळाल्याने विद्युत मंडळाने त्वरीत उपलब्ध करून दिला होता. परंतू, ट्रान्सफार्मर शिल्लक नसल्याचे कारण देऊन विद्युत मंडळ वेळ मारून नेत असल्याचा आरोप नागरिक करत होते. दीड महिन्यापासून खंडित असलेल्या वीजपुरवठ्यामूळे विजेवर चालणारी उपकरणे धूळ खात पडून असल्याने निकामी झाली आहेत.
विजेअभावी पाणी पुरवठा होत नसल्यामुळे महिलावर्गांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली होती. अखेर ‘लोकमत’ मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्ताची दखल घेऊन दोनच दिवसांत ट्रान्सफार्मर बसविल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून ‘लोकमत’ला धन्यवाद दिले आहेत.