देवळा तालुक्यात कोरोनाचा दुसरा रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 08:50 PM2020-06-01T20:50:18+5:302020-06-02T00:40:45+5:30
देवळा : तालुक्यातील दहीवड येथे शुक्र वारी (दि.२९ मे) कोरोनाचा रुग्ण सापडल्यानंतर त्या बाधिताच्या संपर्कातील पाचपैकी एक जणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त असलेल्या देवळा तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या दोनवर गेली आहे. तालुक्यातील नागरिकांची चिंता मात्र आता वाढली असून, प्रशासन सतर्क झाले आहे.

दहीवड येथील शिंद-ओहळ शिवारातील पण कामानिमित्त मुंबई येथे राहणारा एक २८ वर्षीय तरु ण दि. २० मे रोजी दहीवड येथे आपल्या घरी आला होता; परंतु दुसऱ्याच दिवशी त्याच्यात कोरोनासदृश लक्षणे दिसून आल्यामुळे त्याचे स्वॅब नाशिक येथे पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यात खळबळ उडाली
होती.
आरोग्य विभागाने त्या रुग्णाला देवळा येथील कोविड केअर सेंटरमध्ये पुढील उपचारासाठी दाखल केले.
रुग्णाच्या संपर्कातील सहा लोकांना होम क्वॉरण्टाइन करण्यात आले असून, पाच हाय रिस्क व्यक्तींना कोरोना केअर सेंटरमध्ये क्वॉरण्टाइन करण्यात आले आहे. या पाच जणांचा स्बॅब तपासणी अहवाल रविवारी (दि.३१ मे) सकाळी प्राप्त झाला असून, त्यातील एका वृद्धाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी
डॉ. सुभाष मांडगे यांनी दिली आहे. उर्वरित चार अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
--------------------------
नियमांना हरताळ
४देवळा तालुक्यात मुंबई, पुणे यासारख्या कटेन्मेंट झोनमधून आलेल्या नागरिकांना आरोग्य विभागाने होम क्वॉरण्टाइन राहण्यासंदर्भात दिलेल्या सल्ल्याचे हे नागरिक कटाक्षाने पालन करीत नसल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू आहे. शासनाने तसेच गावपातळीवर स्थानिक प्रशासनाने याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.