पावसाळी गटारींसाठी आणखी २५ कोटींची तरतूद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2021 11:43 PM2021-06-08T23:43:54+5:302021-06-09T00:57:20+5:30
नाशिक- पावसाळा सुरू होण्यापूूर्वी सर्व भागात पावसाळी नाल्याचे काम आठ दिवसात पूर्ण करावे असे आदेश महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिले असून पावसाळी पाणी साचत असलेल्या भागात गटारी करण्यासाठी २५ कोटी रूपयांची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापौर सतीश कुलकर्णी यांनी बांधकाम, भूमीगत गटार, पावसाळी गटार विभागाच्या प्रमुखांची बैठक मंगळवारी (दि.८) रामायण येथे घेतली. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
यावेळी शहर अभियंता संजय घुगे यांनी यांनी शहरातील मोठया नाल्यांची साफ सफाईचे कामकाज आजपर्यंत नाले सफाईचे ८० टक्के काम पूर्ण झाल्याचे सांगितले. तसेच उर्वरीत कामकाज येत्या काही दिवसात पुर्ण होणार असल्याची माहीती दिली तर या कामाला वेग देऊन आठ दिवसात सर्व भागातील कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले.
यावेळी अधिक्षक अभियंता श्री नलावडे यांनी सांगितले की विभागाकडे एक रोबोट मशिन मोठे नाले व नदी सफाई साठी उपलब्ध असुन शहराची गरज लक्षात घेता नव्याने दोन रोबोट मशिन घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्याकरीता चालू अर्थसंकल्पात नव्याने दोन रोबोट मशिन खरेदी करणेसाठी दहा कोटी तसेच नव्याने पावासाळी गटारी तयार करण्यासाठी २५ कोटी रूपयांची तरतुद करण्यात येणार असल्याची माहिती महापौर कुलकर्णी यांनी दिली.
या बैठकीस शहर अभियंता संजय घुगे, अधिक्षक अभियंता संदीप नलावडे,कार्यकारी अभियंता उदय धर्माधिकारी, वंजारी, आर एस पाटील, बच्छाव यांचेसह संबधित विभागाचे उप अभियंता उपस्थित होते.