पावसाळी गटारींसाठी आणखी २५ कोटींची तरतूद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:11 AM2021-06-10T04:11:07+5:302021-06-10T04:11:07+5:30
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापौर सतीश कुलकर्णी यांनी बांधकाम, भूमिगत गटार, पावसाळी गटार विभागाच्या प्रमुखांची बैठक मंगळवारी (दि.८) रामायण येथे घेतली. ...
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापौर सतीश कुलकर्णी यांनी बांधकाम, भूमिगत गटार, पावसाळी गटार विभागाच्या प्रमुखांची बैठक मंगळवारी (दि.८) रामायण येथे घेतली. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
यावेळी शहर अभियंता संजय घुगे यांनी शहरातील मोठ्या नाल्यांची साफसफाईचे कामकाज आजपर्यंत ८० टक्के काम पूर्ण झाल्याचे सांगितले. तसेच उर्वरित कामकाज येत्या काही दिवसात पूर्ण होणार असल्याची माहिती दिली तर या कामाला वेग देऊन आठ दिवसात सर्व भागातील कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले.
यावेळी अधीक्षक अभियंता नलावडे यांनी सांगितले की, विभागाकडे एक रोबोट मशीन मोठे नाले व नदी सफाईसाठी उपलब्ध असून शहराची गरज लक्षात घेता नव्याने दोन रोबोट मशीन घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्याकरिता चालू अर्थसंकल्पात नव्याने दोन रोबोट मशीन खरेदी करण्यासाठी दहा कोटी तसेच नव्याने पावसाळी गटारी तयार करण्यासाठी २५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती महापौर कुलकर्णी यांनी दिली.
या बैठकीस शहर अभियंता संजय घुगे, अधीक्षक अभियंता संदीप नलावडे,कार्यकारी अभियंता उदय धर्माधिकारी, वंजारी, आर. एस. पाटील, बच्छाव यांच्यासह संबंधित विभागाचे उपअभियंता उपस्थित होते.