महामार्गावरील खड्ड्यांनी घेतला आणखी एक बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:15 AM2021-09-18T04:15:03+5:302021-09-18T04:15:03+5:30
घोटी : नाशिककडून मुंबईच्या दिशेने कल्याण येथे जाणाऱ्या मोटारसायकलस्वारांना महामार्गावरील रस्त्यावरील खड्डे वाचवण्याच्या नादात व वेगावरील नियंत्रण सुटल्याने माणिकखांब ...
घोटी : नाशिककडून मुंबईच्या दिशेने कल्याण येथे जाणाऱ्या मोटारसायकलस्वारांना महामार्गावरील रस्त्यावरील खड्डे वाचवण्याच्या नादात व वेगावरील नियंत्रण सुटल्याने माणिकखांब येथे झालेल्या अपघातात एक जण ठार व एक जखमी झाला आहे. दररोज महामार्गावर बळी जात असून, महामार्गावरील रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य झाले असल्याने दररोज अपघात नित्याचेच झाले आहे.
दोघे मित्र चेतन दिलीप धोत्रे (२७, रा. हरी निवास, सर्कल नवापाडा, ठाणे) व श्याम सीताराम पाटील (३७, आयटीआय कॉलनी, सातपूर) हे मोटारसायकलने (एमएच १५ जीई १२८१) नाशिकहून कल्याणच्या दिशेने जात असताना मणिकखांब शिवारात जाण्यादेवाच्या मंदिरासमोरील वळण रस्त्यावर खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात चालक चेतन दिलीप धोत्रे यांचे मोटारसायकलवरील नियंत्रण सुटून तो अक्षरशः फुटबॉलसारखा उडाला. त्यात त्याला गळ्यावर, छातीवर, पोटावर जबर मार लागला होता, तर मित्र श्याम पाटील गंभीर जखमी झाला. अपघात झाल्यानंतर दोघांनाही घोटी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता धोत्रे यांना मृत घोषित केले. पाटील यांना जबर मार लागला असल्याने त्याला नाशिक येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रसंगी अपघाताची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भास्कर शेळके, संदीप मथुरे, शीतल गायकवाड, प्रकाश कासार आदी करत आहेत. (१७ घोटी २)
170921\17nsk_15_17092021_13.jpg
१७ घोटी २