‘बोला गांधी...उत्तर द्या’मधून टिकाकारांना उत्तर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 01:24 AM2018-12-11T01:24:36+5:302018-12-11T01:24:55+5:30
कामगार नाट्य स्पर्धा नाशिक : महात्मा गांधीजींच्या हत्येनंतर नथुराम गोडसेंचे काही समर्थक समोर येऊन फाळणीसह भगतसिंगांची फाशी, भारत-पाक सीमारेषा, ...
कामगार नाट्य स्पर्धा
नाशिक : महात्मा गांधीजींच्या हत्येनंतर नथुराम गोडसेंचे काही समर्थक समोर येऊन फाळणीसह भगतसिंगांची फाशी, भारत-पाक सीमारेषा, पुणे करार या मुद्द्यांवर महात्मा गांधीना लक्ष करीत त्यांची भूमिका कशाप्रकारे चुकीची होती हे दाखविण्याचा प्रयत्न करू लागले. हीच परंपरा आजही कायम असून अशा गांधी विरोधकांना तथा टिकाकारांना दिग्दर्शक चिंतामन पाटील यांनी शरद भालेराव लिखित ‘बोला गांधी’ नाटकाच्या माध्यमातून या सर्व घटनांमागे महात्मा गांधीजींची नेमकी भूमिका काय होती याचे चित्र रंगमंचावर उभे करून उत्तर दिले.
कामगार कल्याण मंडळातर्फे प. सा. नाट्यगृहात नाट्य महोत्सवाच्या प्राथमिक स्पर्धेत जळगावच्या ललित कला भवन, कामगार कल्याण केंद्रातर्फे सोमवारी (दि. १०) ‘बोला गांधी उत्तर द्या’ नाटकाचा प्रयोग रंगला. प्रबुद्धची प्रमुख भूमिका शरद भालेराव, तर महात्मा गांधींची भूमिका उत्तम नेरकर यांनी साकारली असून, त्यांच्यासोबत उत्कर्ष नेरकर, चंद्रकांत चौधरी, अरुण सानप, विकास वाघ आदी कलाकारांनी सहायक भूमिका साकारली आहे.
आजचे नाटक : एस-फॅ क्टर वेळ : सायंकाळी ५.३० वाजता.