मृग नक्षत्र कोरडेठाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 08:39 PM2019-06-19T20:39:25+5:302019-06-19T20:39:56+5:30
सायखेडा : जून मिहन्यात पावसाळा सुरू झाला की मृग नक्षत्र मध्ये जोरदार पाऊस पडायचा आण िशेतीकामाना वेग यायचा, मिरगाचा पाऊस शेतात बरकत आणतो, धनधान्य जोरात पिकत असे म्हणायचे मात्र मागील काही वर्षांपासून जून मिहन्यात पावसाचा थेंब पडत नाही दमदार पावसाची सुरवात करणारे मृग नक्षत्र कोरडेठाक पडायला लागल्याने भीषण दुष्काळ पडायला लागला,
सायखेडा : जून मिहन्यात पावसाळा सुरू झाला की मृग नक्षत्र मध्ये जोरदार पाऊस पडायचा आण िशेतीकामाना वेग यायचा, मिरगाचा पाऊस शेतात बरकत आणतो, धनधान्य जोरात पिकत असे म्हणायचे मात्र मागील काही वर्षांपासून जून मिहन्यात पावसाचा थेंब पडत नाही दमदार पावसाची सुरवात करणारे मृग नक्षत्र कोरडेठाक पडायला लागल्याने भीषण दुष्काळ पडायला लागला,
दोन वर्षे पाऊस पडला नाही, तळे भरले नाही, ओहळ पाण्याने भरले नाही, विहिरींना पाणी आले नाही, भीषण दुष्काळ पडला त्यामुळे यंदा जानेवारी मिहन्यात येणार्या मृग नक्षत्राकडे सर्व शेतकर्यांच्या नजरा खिळल्या,आकाशात काळे ढग दाटून येऊ लागले, मात्र सोसाट्याचा वारा सुटला आण िदाटून येणारे ढग वाहून गेले, पाण्याचा एक थेंब देखील पडला नाही
जून मिहना अर्धा संपून गेला आहे मात्र पावसाने पाठ फिरवली असल्याने बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले आहे, येणारे प्रत्येक वर्ष असेच जायला लागले तर कुटुंब कसे चालवावे, दरवर्षी खर्च करण्यासाठी पैसे कुठून उपलब्द करावे, जनावरांना चारा कसा उपलब्द करावा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कसा सोडवावा , मुलांचे शिक्षण, विवाह, गरजेच्या वस्तू खरेदी करतांना पैसा कसा उपलब्द करावा अशा अनेक समस्या निर्माण होत असल्याने शेतकर्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे
अनेक भागात मान्सून पूर्व पाऊस पडला मात्र काही भागात केवळ पावसाळा सुरू झाल्याची चाहूल लागली इतकाच रिमझिम पाऊस पडला तर काही ठिकाणी आध्याप पावसाचे आगमन झाले नाही त्यामुळे जून मिहना संपत आला असला तरी उन्हाळा मात्र कडक आहे, दुष्काळ जैसा थे असल्याने अनेक नागरी समस्या निर्माण होत आहे
जून मिहन्यात सोयाबीन,मका बाजरी,यासारख्या पिकांची पेरणी केली जात असते तर टमाटे ,कोबी फ्लॉवर, भाजीपाला यासारख्या नगदी पिकांची लागवड करून पिके शेतात उभी राहतात, जून मिहन्यात शेतात पीक उभे राहिले तर चार मिहन्यात पीक घेऊन नवीन पीक पुन्हा शेतात उभे केले जाते ,मात्र दोन वर्षांपासून कोणतेच पीक जून मिहन्यात घेता येत नसल्याने पुढील पीक घेतांना पाणी कमी पडते, भीषण दुष्काळ परिस्थितीमुळे मोठी कसरत करावी लागते त्यामुळे जून मिहन्यात जोरदार पाऊस पडून शेतात पिके उभी रहावी अशी अपेक्षा शेतकर्यांची असते, मात्र काही वर्षांपासून पाऊस पडत नसल्याने वर्षाचे नियोजन बिघडत आहे
चौकट
जून मिहन्यात पावसाळा सुरू होतो रोहिणी, मृग नक्षत्र कोरडे गेल्याने भीषण दुष्काळाचा सामना करावा लागत आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, जनावरांच्या चार्याचा प्रश्न, गंभीर झाला आहे, पाऊस पडत नसल्याने पीक घेता येत नाही , उशिरा पाऊस पडला तर पिकांचे नियोजण करता येत नाही आज जवळपास २० दिवस पाऊस उशिरा झाला आहे
रामदास खालकर
शेतकरी औरंगपूर.