अतिक्रमण विरोधी मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 12:27 AM2018-05-20T00:27:34+5:302018-05-20T00:27:34+5:30

मनपा अतिक्रमण विरोधी पथकाकडून गेल्या तीन दिवसांपासून जेलरोड परिसरात रस्त्याच्या आजूबाजूला असलेल्या अनधिकृत पत्र्यांच्या दुकानाचे अतिक्रमण हटविण्यात आले. मनपाने अतिक्रमण विरोधात जोरदार मोहीम सुरू केल्याने अतिक्रमितधारकांचे धाबे दणाणले आहे.

 Anti-encroachment campaign | अतिक्रमण विरोधी मोहीम

अतिक्रमण विरोधी मोहीम

Next

नाशिकरोड : मनपा अतिक्रमण विरोधी पथकाकडून गेल्या तीन दिवसांपासून जेलरोड परिसरात रस्त्याच्या आजूबाजूला असलेल्या अनधिकृत पत्र्यांच्या दुकानाचे अतिक्रमण हटविण्यात आले. मनपाने अतिक्रमण विरोधात जोरदार मोहीम सुरू केल्याने अतिक्रमितधारकांचे धाबे दणाणले आहे.  मनपा अतिक्रमण विरोधी पथकाने शनिवारी जेलरोड, शिवाजीनगर येथील आदर्शनगरमध्ये मनपाच्या उद्यानाच्या आरक्षित जागेत २० बाय १२ आकाराचे दोन खोल्यांचे पक्क्या घराचे बांधकाम जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त करण्यात आले. त्यानंतर जेलरोड देवमाता सदन येथील पदपथवरील गॉगल विक्रेत्याचे दुकान जप्त करण्यात आले. त्यानंतर मनपा विभागीय कार्यालया शेजारील दुर्गा उद्यान भाजीबाजार पदपथ येथे अनधिकृतपणे लावलेल्या फळ विक्रेत्यांना दुकाने काढून घेण्याचे सूचना करण्यात आली.  मनपा अतिक्रमण विरोधी पथकाने शुक्रवारी जेसीबीच्या साह्याने जेलरोड शिवाजी पुतळ्याजवळील एमराल्ड पब्लिक हायस्कूलने इमारतीच्या सामासिक अंतरामध्ये उभारलेले पत्र्याचे शेड जमीनदोस्त करण्यात आले. त्यानंतर जेलरोड दसक येथे बिलवेजा सोसायटीतील अनधिकृतपणे बांधलेले दोन पक्की बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. त्यानंतर इंदिरा गांधी पुतळ्यापासून आगरटाकळी व उपनगरला जाणारा जुना सायखेडा रोडच्या लगत असलेली गॅरेज, फॅब्रिकेशन, पानपट्टी, रसवंती, कुलर दुरुस्ती, दुचाकी गॅरेज आदि छोटी-मोठी ५२ पत्र्यांची दुकाने जमीनदोस्त करण्यात आली. अतिक्रमितधारकांना मनपाकडून अतिक्रमण काढून घेण्याबाबत नोटिसा देण्यात आल्यानंतर काही दुकानदारांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घेतले होते, तर काही अतिक्रमितधारकांनी टपरीचे पत्रे काढून लोखंडी सांगाडा तसाच ठेवला होता. मात्र मनपा अतिक्रमण विरोधी पथकाने शुक्रवारच्या मोहिमेत जेसीबीच्या साह्याने लोखंडी सांगाडा जमीनदोस्त केला. मनपा विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर, अतिक्रमण विभागाचे कैलास भागवत, एम. डी. पगारे, नगररचना विभागाचे अभियंता संजय गावित यांनी एक जेसीबी, दोन ट्रक, गॅस कटर व ३६ कर्मचाऱ्यांच्या मदतीने अतिक्रमण मोहीम राबविली. मनपा अतिक्रमण विरोधी पथकाने दोन दिवसांपूर्वी शिखरेवाडी करी लिव्हज् हॉटेलशेजारील आठ पत्र्यांचे गाळे जमीनदोस्त केले आहे.
अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले
मनपा अतिक्रमण विरोधी पथकाकडून पक्के, पत्र्याचे कच्चे व रस्त्यावरील अनधिकृत विक्रेत्यांविरूद्ध जोरदार मोहीम हाती घेण्यात आल्याने अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहे. तसेच दुकानाच्या बाहेर रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात दुकानातील सामान, इतर वस्तू ठेवणाºयांविरूद्धदेखील मनपाकडून कारवाई करून दंडवसूल केला जात आहे.

Web Title:  Anti-encroachment campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.