मेनरोडवर अतिक्रमणविरोधी मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 12:43 AM2017-12-28T00:43:25+5:302017-12-28T00:45:36+5:30

नाशिक : महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने बुधवारी (दि. २७) मेनरोडसह भद्रकाली परिसर, नेहरू चौक, चांदवडकर लेन या भागात व्यापारी-व्यावसायिकांनी दुकानांसमोर केलेल्या वाढीव बांधकामांसह शेड्स हटविण्याची कारवाई केली. महापालिकेने प्रस्तावित हॉकर्स झोनमधीलही अतिक्रमित टपºया हटविल्या.

Anti-encroachment campaign on Main Road | मेनरोडवर अतिक्रमणविरोधी मोहीम

मेनरोडवर अतिक्रमणविरोधी मोहीम

Next
ठळक मुद्देमहापालिकेची कारवाई : व्यावसायिकांच्या वाढीव बांधकामांवर हातोडाहॉकर्स झोनमधीलही अतिक्रमित टपºया हटविल्या

नाशिक : महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने बुधवारी (दि. २७) मेनरोडसह भद्रकाली परिसर, नेहरू चौक, चांदवडकर लेन या भागात व्यापारी-व्यावसायिकांनी दुकानांसमोर केलेल्या वाढीव बांधकामांसह शेड्स हटविण्याची कारवाई केली. महापालिकेने प्रस्तावित हॉकर्स झोनमधीलही अतिक्रमित टपºया हटविल्या.
शहरातील मध्यवर्ती भागात प्रमुख बाजारपेठ असलेल्या मेनरोडसह भद्रकाली परिसर, नेहरू चौक, चांदवडकर लेन, धुमाळ पॉर्इंट या परिसरात रस्त्यावरील फेरीवाल्यांबरोबरच स्थानिक व्यापारी-व्यावसायिकांनीही आपल्या दुकानांसमोर अतिक्रमण केल्याच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या. बव्हंशी व्यापारी-व्यावसायिकांनी दुकानांच्या फलकासमोर पत्र्याचे शेड तसेच दुकानासमोर माल लावत अतिक्रमण केल्याने रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. पादचाºयांनाही या रस्त्यांतून मार्ग काढणे अवघड होऊन बसले होते. काही व्यावसायिकांनी तर फेरीवाल्यांना आपल्या दुकानांसमोर जागा देत त्यांच्याकडून भाडे वसुलीही सुरू असल्याच्या तक्रारी होत्या. काही दिवसांपूर्वीच भद्रकाली परिसरातील अब्दुल हमीद चौक परिसरात थेट रस्त्यावरच दुकाने थाटली गेल्याने स्थानिक व्यावसायिकांनी अतिरिक्त आयुक्तांना निवेदन दिले होते. त्यानुसार, महापालिकेच्या पश्चिम आणि पूर्व विभागाने बुधवारी (दि.२७) संयुक्तरीत्या अतिक्रमणविरोधी मोहीम राबविली. भद्रकाली परिसरापासून या मोहिमेस सुरुवात करण्यात आली. त्यानंतर नेहरू चौक ते धुमाळ पार्इंटदरम्यान मोहीम राबवत व्यापारी-व्यावसायिकांनी उभारलेले शेड हटविण्यात आले.मातंगवाड्यातील टपºया हटवल्यामहापालिकेने राष्टÑीय फेरीवाला धोरणांतर्गत हॉकर्स झोन निश्चित केले आहेत. मातंगवाडा येथे हॉकर्स झोनमध्ये असलेल्या टपºया हटविण्याची कारवाई यावेळी करण्यात आली. तसेच प्रभात थिएटरमागील महापालिकेच्या गाळ्यांभोवती करण्यात आलेल्या वाढीव बांधकामांवरही जेसीबी चालविण्यात आला.

Web Title: Anti-encroachment campaign on Main Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.