पाकविरोधी भावनांचा उद्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 01:28 AM2019-02-19T01:28:39+5:302019-02-19T01:30:06+5:30
नाशिक : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेबद्दल तिसऱ्या दिवशीही जिल्ह्यात ठिकठिकाणी पाकविरोधी भावनांचा उद्रेक बघायला मिळाला. विविध संस्था, संघटनांनी पाकिस्तानविरोधी घोषणा देत पाकच्या ध्वजाची होळी केली. तसेच मूक मोर्चे आणि कॅँडल मार्च काढून निषेध नोंदविला.
नाशिक : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेबद्दल तिसऱ्या दिवशीही जिल्ह्यात ठिकठिकाणी पाकविरोधी भावनांचा उद्रेक बघायला मिळाला. विविध संस्था, संघटनांनी पाकिस्तानविरोधी घोषणा देत पाकच्या ध्वजाची होळी केली. तसेच मूक मोर्चे आणि कॅँडल मार्च काढून निषेध नोंदविला.
जय बाबाजी परिवाराकडून निषेध
जम्मू-काश्मीर येथील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने पाकिस्तान विरोधी घोषणा देत पाकच्या ध्वजाची होळी करण्यात आली. यावेळी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
आध्यात्मिक उन्नती ते राष्ट्रकल्याण अशी वाटचाल करणाºया जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ अशा घोषणा देत पाकच्या ध्वजाचीही होळी करण्यात आली. यावेळी भक्त परिवारातील प्रतिनिधींनी आपल्या मनोगतातून पाकिस्तानचा दहशतवादी देश म्हणून नामोल्लेख करतांनाच पाकिस्तानला कायमची अद्दल घडविण्यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी ‘भारत माता की जय, जय हिंद’ असा जयघोष करण्यात आला. याप्रसंगी चांदवड, निफाड, येवला यांसह नाशिक जिल्ह्यातील विविध तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुस्लीम बांधवांकडून दहन
सटाणा : जम्मू-काश्मीर येथील पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या भ्याड आत्मघातकी हल्ल्याच्या निषेधार्थ येथील मुल्ला यूथ क्लब, मानवाधिकार संघटना व मुस्लीम पंच कमिटीच्या सदस्यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा प्रतीकात्मक पुतळा जाळून भारतमाता की जय, वंदे मातरम्च्या घोषणा दिल्या.
येथील हुतात्मा स्मारकाजवळ सायंकाळी पाकिस्तानच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा प्रतीकात्मक पुतळा तयार करून त्याला चप्पलांचा हार घालून जोडे मारण्यात आले. त्यानंतर पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत पुतळा जाळून निषेध करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक शफीक मुल्ला, मुन्ना रब्बानी, सिराज वाहीद मुल्ला, मानवाधिकार संघटनेचे तालुका अध्यक्ष मोसिन सुलतान शहा, खालीद शेख, फरिद शेख, कलीम शेख, इमरान अख्तर, आरिफ शहा, याकूब तांबोळी, महेंद्र शर्मा, अफताब मुल्ला, आरिफ मुल्ला,रजिवान सय्यद, साहील शेख, शहारूक मनियार, दानिश मुल्ला,रईस शहा, आजाद मुल्ला, आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.माळवाडीत कॅँडल मार्च
पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील वीर जवानांना कँडल मार्च काढून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी युवकांसह विद्यार्थ्यांनी ‘पाकिस्तान मुर्दाबाद’, ‘अमर रहे अमर रहे वीर जवान अमर रहे’ अशा घोषणा देत जवानांना श्रद्धांजली वाहिली. फुले क्र ांती फ्रेण्ड्स सर्कल व एम. एफ ग्रुपच्या वतीने जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच नागरिकांच्या बैठकीत शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत म्हणून निधी संकलित करण्याचा संकल्प करण्यात आला. यावेळी एम. एफ. ग्रुपचे अध्यक्ष सुरज अहिरे, कृष्णा अहिरे, दिलीप गुंजाळ, ग्रामपंचायत सदस्य निकेश जाधव, निंबा आहेर, व्यावसायिक अंकुश खैरनार, बापू क्षीरसागर, शेतकरी सतीश बागुल, प्रकाश भदाणे, कैलास बागुल, प्रवीण बागुल, हेमंत बागुल आदी उपस्थित होते.