नगरसूलला प्लास्टिकविरोधी जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2021 07:03 PM2021-02-04T19:03:24+5:302021-02-05T00:12:49+5:30
नगरसूल : ह्यमाझी वसुंधरा अभियान अंतर्गत येथील ग्रामपंचायतीने प्लास्टिकचा वापर न करण्यासाठी दुकानदारांना नोटीसा बजावल्या आहेत. याशिवाय प्लास्टिकचा वापर करणार नाही, अशी शपथ दुकानदारांना देण्यात आली आहे. शिवाय प्लास्टिकविरोधी जनजागृती केली जात आहे.

गावात प्लास्टिक व थर्माकॉल बंदीसाठी ग्रामपंचायतीने दुकानदारांची बैठक घेऊन जनजागृती केली. त्या अनुषंगाने ग्रामपंचायतीने दुकानदारांना नोटीसाही बजावल्या आहेत. त्यात ओला व सुका कचरा यासाठी दोन स्वतंत्र डस्टबीन अनिवार्य असून, त्यात कसुर केल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. माझी वसुंधरा अभियान यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन नगरसूल ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी गोरख निकम यांनी केले आहे.
फोटो- ०४ नगरसूल ग्रामपंचायत
नगरसूल येथे प्लास्टिकविरोधी शपथ घेताना व्यावसायिक.