उमराणे बाजार समितीत व्यापारी, शेतकऱ्यांची अँटिजन तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:31 PM2021-06-24T16:31:47+5:302021-06-24T16:34:07+5:30

उमराणे : कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात ठेवण्यासाठी येथील निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समिती व प्राथमिक आरोग्य केंद्र दहिवड यांच्या संयुक्त विद्यमाने कांदा व्यापारी, कांदा विक्रेते शेतकरी व वाहनधारक यांची अँटिजन तपासणी करण्यात आली. तपासणीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Antigen inspection of traders and farmers in Umrane market committee | उमराणे बाजार समितीत व्यापारी, शेतकऱ्यांची अँटिजन तपासणी

उमराणे बाजार समितीत अँटिजन तपासणी करताना व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संदेश बाफणा व व्यापारी तसेच समितीचे सचिव नितीन जाधव आदी.

Next
ठळक मुद्देउत्स्फूर्त प्रतिसाद; खबरदारीसाठी संचालकांचा निर्णय

उमराणे : कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात ठेवण्यासाठी येथील निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समिती व प्राथमिक आरोग्य केंद्र दहिवड यांच्या संयुक्त विद्यमाने कांदा व्यापारी, कांदा विक्रेते शेतकरी व वाहनधारक यांची अँटिजन तपासणी करण्यात आली. तपासणीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कोरोना प्रादुर्भाव वाढू नये यासाठी बाजार समितीकडून कोरोनाविषयक जनजागृती सुरू असतानाच खबरदारीची उपाययोजना म्हणून बाजार समिती व प्राथमिक आरोग्य केंद्र दहिवड यांच्या संयुक्त विद्यमाने बाजार समितीच्या आवारात प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी जे. व्ही. भामरे, समुदाय आरोग्य अधिकारी सुमित शिंदे, आरोग्य सेवक चिंतामण पवार, युवराज जाधव यांनी कांदा व्यापारी व कांदा विक्रेते शेतकरी, तसेच वाहनधारकांची अँटिजन तपासणी केली. तपासणीसाठी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

तपासणीप्रसंगी कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संदेश बाफणा, कांदा व्यापारी सुनील दत्तू देवरे, बाळासाहेब देवरे, महेंद्र मोदी, प्रवीणलाल बाफणा, शैलेश देवरे, प्रवीण देवरे, भावेश बाफणा, मुन्ना अहेर, केतन बाफणा, रामदास गायकवाड, बाजार समितीचे सचिव नितीन जाधव, सह. सचिव तुषार गायकवाड, कर्मचारी केशव देवरे आदींसह व्यापारी, शेतकरी व वाहनधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उमराणे बाजार समितीत कांदा खरेदीदार व्यापारी, कांदा विक्रेते व वाहनधारकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. परिणामी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी आरोग्य विभागाकडे अँटिजन तपासणीसाठी मागणी करण्यात आली होती. त्याअनुषंगाने प्राथमिक आरोग्य केंद्र दहिवड व बाजार समिती उमराणे यांच्या संयुक्त विद्यमाने कांदा व्यापारी, कांदा विक्रेते शेतकरी व वाहनधारकांची अँटिजन तपासणी करण्यात आली असून जास्तीत जास्त नागरिकांनी अँटिजन तपासणी करून घ्यावी.
- सोनाली देवरे, मुख्य प्रशासक, बाजार समिती, उमराणे,




 

Web Title: Antigen inspection of traders and farmers in Umrane market committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.