पिळकोसला १५० जणांची अँटिजन टेस्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:13 AM2021-05-23T04:13:08+5:302021-05-23T04:13:08+5:30
पिळकोस : कळवण तालुक्यातील पिळकोस येथे एका महिन्यापासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने व ...
पिळकोस : कळवण तालुक्यातील पिळकोस येथे एका महिन्यापासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने व तीन जणांचा कोरोनामुळे बळी गेल्यामुळे नवी बेज प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे गावात अँटिजन टेस्ट मोहीम राबवण्यात आली.यात गावातील १५० नागरिकांची अँटिजन टेस्ट करण्यात आली असता सहा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले.
एका महिन्याच्या कालावधीत गावात ४९ नागरिकांना कोरोनाची लागण झाली. त्यात ३५ बाधित रुग्ण हे या आजारातून सावरले. तीन जणांचे बळी गेले आहेत. सध्या गावात १४ रुग्ण बाधित असून त्यांच्यावर घरी उपचार सुरू आहेत. फक्त तीन रुग्ण हे कोविड सेंटरला उपचार घेत असून त्यांची प्रकृती ही सुधारत असल्याचे आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आले. गावात अँटिजन टेस्ट मोहिमेप्रसंगी आरोग्यसेविका अलका शिंदे,आरोग्य सहायक सुधाकर भामरे, आरोग्य सेवक डी.पी.गुंजाळ,प्रशांत जाधव, अनिल शिवदे, ग्रामसेवक नितीन बच्छाव,शिंगाडे,आशा सेविका सुलोचना बर्वे , यांनी विशेेष परिश्रम घेतले.
-----------------
पिळकोस गावात अँटिजन टेस्ट मोहिमेप्रसंगी आरोग्य सेविका अलका शिंदे, सुधाकर भामरे, डी.पी.गुंजाळ,प्रशांत जाधव,अनिल शिवदे , नितीन बच्छाव आदी. (२२ पिळकोस)
===Photopath===
220521\22nsk_9_22052021_13.jpg
===Caption===
२२ पिळकोस