विनामास्क फिरणाऱ्या ३२ शेतकरी, कामगारांची ॲंटिजन टेस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:17 AM2021-07-14T04:17:28+5:302021-07-14T04:17:28+5:30

लासलगाव : येथील बाजार समितीच्या आवारात विनामास्क आढळून आलेल्या ३२ शेतकरी व कामगारांची ॲंटिजन टेस्ट करण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव ...

Antigen test of 32 farmers and workers walking without masks | विनामास्क फिरणाऱ्या ३२ शेतकरी, कामगारांची ॲंटिजन टेस्ट

विनामास्क फिरणाऱ्या ३२ शेतकरी, कामगारांची ॲंटिजन टेस्ट

Next

लासलगाव : येथील बाजार समितीच्या आवारात विनामास्क आढळून आलेल्या ३२ शेतकरी व कामगारांची ॲंटिजन टेस्ट करण्यात आली.

कोरोनाचा प्रादुर्भाव निफाड तालुक्यात काही प्रमाणात स्पष्ट जाणवत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून गर्दीचे केंद्र असलेल्या बाजार समितीचे मुख्य बाजार आवारास सहाय्यक निबंधक अभिजित देशपांडे यांनी सचिव नरेंद्र वाढवणे यांच्यासह अचानक भेट देऊन पाहणी केली. यावेळी आवारात विनामास्क आढळून आलेल्या ३२ शेतकरी व कामगारांची ॲंटिजन टेस्ट करण्यात आली. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी लासलगाव येथे कोरोना आढावा बैठकीत दररोज बाजार समितीत आलेल्या घटकांची नियमितपणे ॲंटिजन टेस्ट, ऑक्सिजन व तापमान तपासणी आणि सॅनिटायझेशन करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सहाय्यक निबंधक अभिजित देशपांडे यांनी लासलगाव मुख्य बाजार आवारात फळे व भाजीपाला लिलावाची पहाणी करून लासलगाव मुख्य, निफाड व विंचूर उपबाजार आवारावर तसेच खानगावनजीक तात्पुरत्या खरेदी-विक्री केंद्रावर जे शेतकरी बांधव व इतर मार्केट घटक विनामास्क येतील तसेच त्यांचे जवळ सॅनिटाझर नसेल अशा इसमांची तात्काळ ॲंटिजन टेस्ट करून पॉझिटिव्ह आढळून आल्यास तातडीने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे. तसेच शेतीमाल विक्रीस आलेल्या शेतकरी बांधवांना एका वाहनासोबत एका व्यक्तीस प्रवेश द्यावा. लिलावाच्या ठिकाणी अनावश्यक गर्दी टाळावी आणि कोरोना विषाणूपासून सुरक्षित राहण्यासाठी सतत सॅनिटाझर व मास्क वापरणेसह सर्व मार्केट घटकांचे प्राधान्याने लसीकरण करून घेण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी सहाय्यक निबंधक देशपांडे यांच्यासह बाजार समिती सेवकांच्या ॲंटिजन टेस्ट करण्यात आल्या. याप्रसंगी सचिव नरेंद्र वाढवणे यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाजार समिती करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी बाजार समितीचे सहसचिव प्रकाश कुमावत, सर्व लिलाव प्रमुख सुनील डचके, हिरालाल सोनारे, प्रभारी स्वप्निल पवार यांच्यासह व्यापारी व शेतकरी उपस्थित होते. (१३ लासलगाव १)

Web Title: Antigen test of 32 farmers and workers walking without masks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.