मालेगावी चार पथकांद्वारे अँटिजन टेस्ट सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:14 AM2021-05-19T04:14:03+5:302021-05-19T04:14:03+5:30

मालेगाव : शहरातील कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी महापालिका व पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. मंगळवारी चार पथकांद्वारे शहरात विनामास्क ...

Antigen test started by four teams in Malegaon | मालेगावी चार पथकांद्वारे अँटिजन टेस्ट सुरू

मालेगावी चार पथकांद्वारे अँटिजन टेस्ट सुरू

googlenewsNext

मालेगाव : शहरातील कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी महापालिका व पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. मंगळवारी चार पथकांद्वारे शहरात विनामास्क व विनाकारण फिरणाऱ्यांची अँटिजन टेस्ट केली जात आहे. या टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळल्यास त्या रुग्णांची रवानगी कोरोना सेंटरमध्ये केली जात आहे.

शहरातील कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात असली तरी नागरिकांची बेफिकीर वृत्ती दिसून येत आहे. लॉकडाऊन असतानादेखील विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मंगळवारी महापालिका व पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली. शहरातील मोसमपूल, रावळगावनाका, गिरणा पूल, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ वैद्यकीय व पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले होते. विनाकारण फिरणारे व विनामास्क नागरिकांना पकडून त्यांची अँटिजन टेस्ट केली जात होती. सोमवारपासून या टेस्टला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ३०० जणांची अँटिजन टेस्ट करण्यात आली असून या टेस्टमध्ये १७ जण बाधित आढळून आले आहेत. या बाधितांची रवानगी कोविड सेंटरमध्ये करण्यात आली आहे. या वेळी महापालिका आयुक्त भालचंद्र गोसावी, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी अँटिजन टेस्टच्या चेकपोस्टला भेट देऊन पाहणी केली.

फोटो फाईल नेम : १८ एमएमएवाय ०१ . जेपीजी

मालेगावी विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना टेस्ट करताना प्रयोगशाळा तंत्रज्ञ विपुल पवार, सना महेमुद अहमद. समवेत अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय महाजन व पोलीस कर्मचारी.

===Photopath===

180521\18nsk_3_18052021_13.jpg

===Caption===

फोटो कॅप्शन बातमी सोबत दिले आहे.

Web Title: Antigen test started by four teams in Malegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.