अॅँटिजन टेस्ट पुन्हा वाढविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 01:18 AM2020-09-16T01:18:56+5:302020-09-16T01:22:04+5:30
शहरात कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता अॅँटिजन चाचण्या थांबविण्यास नगरसेवकांनी तीव्र विरोध केला. त्यामुळे महापौर सतीश कुलकर्णी यांनीदेखील शहरात पूर्ववत अॅँटिजेन टेस्ट करण्याचा निर्णय जाहीर केला. परंतु त्याचबरोबर महापालिकेने घसा स्त्राव चाचण्यादेखील वाढविण्याचे सुचित केले आहे. दरम्यान, संसर्ग टाळण्यासाठी मास्क न लावणाऱ्यांवर तसेच थुंकीबहाद्दरांवर दोनशेऐवजी पाचशे रुपयांचा दंड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
नाशिक : शहरात कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता अॅँटिजन चाचण्या थांबविण्यास नगरसेवकांनी तीव्र विरोध केला. त्यामुळे महापौर सतीश कुलकर्णी यांनीदेखील शहरात पूर्ववत अॅँटिजेन टेस्ट करण्याचा निर्णय जाहीर केला. परंतु त्याचबरोबर महापालिकेने घसा स्त्राव चाचण्यादेखील वाढविण्याचे सुचित केले आहे. दरम्यान, संसर्ग टाळण्यासाठी मास्क न लावणाऱ्यांवर तसेच थुंकीबहाद्दरांवर दोनशेऐवजी पाचशे रुपयांचा दंड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मनपा आणि पोलीस अशी संयुक्त ही कारवाई करतील तर तर शहरात खासगी रुग्णालयांवर नियंत्रण आणण्यासासाठी जिल्हाधिकरी तसेच जिल्हा शल्य चिकित्सकांसमवेत बैठक घेण्याचे ठरविण्यात आले.
शहरात कोरानाची वाढती संख्या लक्षात घेता महापालिकेची विशेष महासभा घेण्याची मागणी होत होती. उपमहापौर भिकुबाई बागूल यांनी यासंदर्भात मागणी केली होती. तर महापौर सतीश कुलकर्णी यांनी अगोदरच १५ सप्टेंबर रोजी होणा-या महासभेत कोरोनाबाबत चर्चा करण्याचे जाहिर केले होते. राष्ट्रवादी कॉँग्रसचे गटनेता गजानन शेलार, अपक्ष गटनेता गुरूमितसिंग बग्गा यांनी यासंदर्भात लक्षवेधी दिली होती. त्यानुसार ही सभा मंगळवारी (दि.१५) पार पडली. नगरसेवकांच्या तक्रारी आणि महापालिकेच्या वैद्यकिय सेवेतील उणिव याचा विचार करून महापौरांनी काही निर्णय सभेच्या अखेरीस घोषीत केले.
शहरात कोरोना चाचण्यावाढल्याने रूग्ण वाढत असले तरी त्यामुळे संबंधीतांना तत्काळ शोधून उपचार करणे आणि संसर्ग टाळणे शक्य आहे. त्यामुळे चाचण्या कमी करण्याचा प्रशासनाच्या भूमिकेवर फुली मारत शहरात पुन्हा नगरसेवक आणि सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून चाचण्या वाढविण्याचा निर्णय महापौरांनी जाहिर केला.
अॅँटिजेन टेस्ट बरोबरच स्वॅब टेस्ट देखील महापालिका सुरूच ठेवणार आहे.
आॅक्सिजन साठ्यासाठी दोन टाक्या
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना आॅक्सिजनची टंचाई जाणवत असल्याने त्यावर उपाययोजना म्हणून आॅक्सिजनचा पुरवठा साठा करण्यासाठी बिटको रुग्णालयात वीस तर डॉ. झाकीर हुसेन हुसेन रूग्णालयात दहा हजार द्रवरूप आॅक्सिजन साठविण्याच्या टाक्या बांधण्यात येत असून आठ ते दहा दिवसात त्या कार्यान्वित होतील, असे यावेळी सांगण्यात आले.
दुकानदारांना सक्ती
शहरातील दुकानांमध्ये नागरीकांची गर्दी होत असल्याने सर्व दुकानदारांना मास्क, हॅँड ग्लोव्हज आणि फिजिकल डिस्टन्सिंंगच्या नियमांचे पालन करण्याची सक्ती करण्यात आली असून तसे न करणाºयांवर कारवाई केली जाणार आहे.
होम टु होम मास्क मोहीम
नागरिकांनी आरोग्य नियमानुसार मास्क लावणे बंधनकारक आहे. त्यासाठी होम ट होम मास्कची संकल्पना महापौर सतीश कुलकर्णी यांनी मांडली आहे. घरातून बाहेर पडताना मास्क लावल्यानंतर पुन्हा घरी गेल्यानंतरच मास्क काढण्याबाबत जनप्रबोधन मोहिम राबविण्यात येणार आहे.