बाजार समितीत शेतकऱ्यांची अँटिजन चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:15 AM2021-05-26T04:15:41+5:302021-05-26T04:15:41+5:30
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत जिल्हाभरातील शेतकरी भाजीपाला विक्रीसाठी आणतात. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाशिकमध्ये बारा ...
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत जिल्हाभरातील शेतकरी भाजीपाला विक्रीसाठी आणतात. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाशिकमध्ये बारा दिवस कडक लॉकडाऊन केले होते. त्यात बाजार समित्याही बंद केल्या होत्या. रुग्णसंख्या कमी झाल्यावर सोमवारपासून निर्बंध शिथिल करीत बाजार समित्या नियमांचे पालन करीत सुरू करण्यात आल्या. बाजार समितीत येणाऱ्या शेतकरी व बाजार समिती घटकांची कोरोना चाचणी करण्यासाठी मनपा प्रशासनाने अँटिजन किट उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी बाजार समिती प्रशासनाने मनपाकडे केली होती. त्यानुसार कृषी उत्पन्न बाजार समिती व नाशिक मनपाच्या माध्यमातून रॅपिड अँटिजन चाचणी सुरू करण्यात आली.
यावेळी बाजार समिती सभापती देवीदास पिंगळे, संचालक तुकाराम पेखळे, संदीप पाटील, सचिव अरुण काळे, पंचवटी विभागीय वैद्यकीय अधिकारी विजय देवकर उपस्थित होते.
आज पहिल्या दिवशी ९८ शेतकरी व बाजार समिती घटकांच्या अँटिजन चाचणी करण्यात आली. त्यात सर्व अहवाल नकारात्मक आल्याचे बाजार समिती सूत्रांनी सांगितले. (फोटो २५ पंचवटी)