नाशकात बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 12:50 AM2020-05-27T00:50:21+5:302020-05-27T00:52:02+5:30
शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शहरात मंगळवारी (दि.२६) आणखी बारा संशयितांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील बाधितांची संख्या १२८ झाली आहे. याशिवाय मालेगाव येथे कर्तव्य बजावताना कोरोना संसर्ग झालेल्या आणि शहरातील कॉलेजरोड येथे राहणाऱ्या एका पोलीस अधिकाºयाचा सकाळी मृत्यू झाला. तर काल रात्री झालेल्या एका पोलिसाचा आणि टाकळीरोड येथील आरोग्य सेवकाचा मृत्यू झाल्याने चोवीस तासात कोरोनामुळेच तीन जणंचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे नाशिक शहरात उपचार घेताना मृत्यू झालेल्यांची संख्या ७ झाली आहे.
नाशिक : शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शहरात मंगळवारी (दि.२६) आणखी बारा संशयितांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील बाधितांची संख्या १२८ झाली आहे. याशिवाय मालेगाव येथे कर्तव्य बजावताना कोरोना संसर्ग झालेल्या आणि शहरातील कॉलेजरोड येथे राहणाऱ्या एका पोलीस अधिकाºयाचा सकाळी मृत्यू झाला. तर काल रात्री झालेल्या एका पोलिसाचा आणि टाकळीरोड येथील आरोग्य सेवकाचा मृत्यू झाल्याने चोवीस तासात कोरोनामुळेच तीन जणंचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे नाशिक शहरात उपचार घेताना मृत्यू झालेल्यांची संख्या ७ झाली आहे.
मालेगाव येथील एका पोलीस अधिकाºयास त्रास होऊ लागल्याने त्याला २१ मे रोजी डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले. तेथे त्यांच्या घसा स्त्रावाचे नमुने घेण्यात आले आणि उपचारही सुरू करण्यात आले. दरम्यान, २४ मे रोजी त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांच्यावर आडगाव येथील डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचार सुरू होते. तेथे सोमवारी त्यांची प्रकृती गंभीर झाली आणि मंगळवारी दुपारी निधन झाले. कॉलेजरोडवर वास्तव्यास असलेल्या या पोलीस कर्मचाºयाच्या कुटुंबातील चौघे जण अगोदरच पॉझिटिव्ह आहेत. त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत. दरम्यान, सायंकाळी व रात्री आणखी बारा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सायंकाळी शहरातील एकूण १२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यातील सात रुग्ण हे आधीच्या रुग्णांच्या संपर्कातील पॉझिटिव्ह आहेत तर, तीन रुग्ण नवीन आढळले आहेत. जुुन्या रुग्णांपैकी जेलरोडवरील चंपानगरीतील रुग्णाच्या संपर्कातील ३८ वर्षीय व २० वर्षीय व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर त्यांच्याच संपर्कातील जेलरोडवरील कॅनॉल रोडवरील ४५ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. क्रांतीनगर येथील हमाली काम करणाºया रुग्णाच्या संपर्कातील एका युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर आगर टाकळी येथील बाधिताच्या संपर्कातील परंतु हनुमानवाडी येथे राहणाºया २७ वर्षीय युवकाचा अहवालदेखील पॉझिटिव्ह आला आहे.
पॉझिटिव्ह संपर्कातील व्यक्ती अधिक
पंचवटीतील महालक्ष्मी चित्रपटगृहाजवळ रविवारी (दि.२४) आढळलेल्या हॉटेल व्यावसायिकाच्या कुटुंबातील दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर पंडितनगर येथेही अगोदरच्या बाधितामुळे एका ६५ वर्षीय वृध्देला संसर्ग झाला आहे. पखालरोड येथील ७३ वर्षीय बाधिताच्या संपर्कातील युवक तर वडाळागाव येथेही एका रुग्णाच्या संपर्कात असलेल्या ५९ वर्षाच्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जत्रा हॉटेलजवळील श्रीरामनगर येथेदेखील एका बाधितामुळे अन्य ६४ वर्षाच्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर पोलीस मुख्यालयातदेखील एका कर्मचाºयाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.