खतप्रकल्प कोणत्याही परिस्थितीत स्वबळावर पूर्ण क्षमतेने चालवू शकत नाही,
By admin | Published: February 6, 2015 02:18 AM2015-02-06T02:18:33+5:302015-02-06T02:19:36+5:30
खतप्रकल्प कोणत्याही परिस्थितीत स्वबळावर पूर्ण क्षमतेने चालवू शकत नाही,
नाशिक : महापालिका खतप्रकल्प कोणत्याही परिस्थितीत स्वबळावर पूर्ण क्षमतेने चालवू शकत नाही, अशी स्पष्ट कबुली देत महापौर अशोक मुर्तडक यांनी खतप्रकल्पाच्या खासगीकरणाला हिरवा कंदील दाखविला असून, त्यासाठी निविदाप्रक्रिया राबविण्याची सूचना प्रशासनाला केली आहे. महापौरांच्या या भूमिकेमुळे प्रशासनाकडून सुरू असलेल्या प्रयत्नांनाही बळ लाभले असून, खासगीकरणाच्या प्रक्रियेला चालना मिळणार आहे.पांडवलेणीच्या पायथ्याशी महापालिकेने उभारलेला खतप्रकल्प एकेकाळी आदर्शवत ठरला होता. देश-विदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींनी खतप्रकल्पाला भेटी देऊन त्याचे कौतुक केले होते. परंतु कालांतराने महापालिकेच्या दुर्लक्षामुळे खतप्रकल्पाची वाताहत झाली. अपुऱ्या मनुष्यबळाअभावी आणि रडतखडत चाललेल्या यंत्रसामग्रीमुळे खतप्रकल्पाने जवळपास मान टाकली आहे.