आयोध्येत जाऊन कुणीही दर्शन घेऊ शकतो- फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2022 01:47 AM2022-05-11T01:47:48+5:302022-05-11T01:48:32+5:30

राज ठाकरे यांच्या नियोजित अयोध्या दौऱ्यावरून भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी राज विरोधात मोट उभी केली असून उत्तरप्रदेशात राजकारण चांगलेच तापले असताना अयोध्येत जाऊन कुणीही श्रीरामाचे दर्शन घेऊ शकतो अशी भूमिका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. बृजभूषण यांनी केलेल्या विरोधाचे कारण आपणाला माहित नसून त्यांच्याशी आपले काहीही बोलणे झाले नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

Anyone can visit Ayodhya - Fadnavis | आयोध्येत जाऊन कुणीही दर्शन घेऊ शकतो- फडणवीस

आयोध्येत जाऊन कुणीही दर्शन घेऊ शकतो- फडणवीस

Next

नाशिक : राज ठाकरे यांच्या नियोजित अयोध्या दौऱ्यावरून भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी राज विरोधात मोट उभी केली असून उत्तरप्रदेशात राजकारण चांगलेच तापले असताना अयोध्येत जाऊन कुणीही श्रीरामाचे दर्शन घेऊ शकतो अशी भूमिका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. बृजभूषण यांनी केलेल्या विरोधाचे कारण आपणाला माहित नसून त्यांच्याशी आपले काहीही बोलणे झाले नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

नाशिकमध्ये खासगी कार्यक्रमासाठी आलेले फडणवीस यांनी राज यांच्या अयोध्या दौऱ्याविषयी सावध भूमिका मांडली. उत्तर प्रदेशात राज ठाकरे यांना उघडपणे विरोध सुरू असून जनसमुदाय रस्त्यावर उतरला आहे. याविषयी त्यांना विचारले असता अयोध्येत श्रीरामाच्या चरणी कुणीही जाऊन दर्शन घेऊ शकतो इतकीच प्रतिक्रिया त्यांनी दिली. यावेळी त्यांनी राणा दाम्पत्यावरील राजद्रोहाच्या गुन्ह्याविषयी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले. हनुमान चालिसा म्हणणे हा राजद्रोह होऊ शकत नाही. सध्या राज्यात अनाचार सुरू असून मनमानी पद्धतीने दडपशाही सुरू असल्याचा आरोप फडणवीस यांनी यावेळी केला. राज्यातील महाविकास आघाडी सरकारविरोधात आम्ही लढतच आहोत राज ठाकरे यांनी देखील लढले पाहिजे असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते म्हणून शरद पवार यांनी राज्यातील प्रश्नाकडे अधिक लक्ष दिले तर अधिक चांगले होईल. शेतकरी, महिला आदिवासी आणि बारा बलुतेदारांच्या प्रश्नांकडे लक्ष देऊन त्यांच्या सरकाला निर्देश दिले पाहिजे. राज्यातील कारभार ज्या पद्धतीने सुरू आहे तो पाहता महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांनीच उद्धव ठाकरे यांना सल्ला दिला पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

--इन्फो--

भोंग्यावरील कारवाई संदर्भात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहलेल्या पत्राविषयी फडणवीस यांना विचारले असता. राज ठाकरे मुख्यमंत्र्यांकडून इतकी भाबडी अपेक्षा ठेवतील असे वाटले नव्हते असे म्हटले. सरकारने इतक्या मर्यादा सोडल्या आहेत की, हनुमान चालीसा म्हटल्यानंतर राजद्राेहाचा गुन्हा दाखल करून आमदार आणि खासदारांना जेलमध्ये ठेवतात त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. राज्य सरकार विरोधात आम्ही लढत आहोत राज ठाकरे यांनीही लढले पाहिजे असा सल्लाही त्यांनी राज यांना दिला.

Web Title: Anyone can visit Ayodhya - Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.