एन्झोकेमने पटकावला ‘अटल करंडक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 11:27 PM2020-01-01T23:27:47+5:302020-01-01T23:28:20+5:30

महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा येवला यांच्या वतीने आयोजित काव्यस्पर्धेत एन्झोकेम विद्यालयाने सहभागी होत भारतरत्न अटलबिहारी बाजपेयी करंडक पटकावला आहे.

Anzochem wins 'Atlantic Trophy' | एन्झोकेमने पटकावला ‘अटल करंडक’

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी करंडक शकुंतला कानडे, लक्ष्मण महाडिक यांच्या हस्ते स्वीकारताना प्रतिमा खोकले, जानवी विटनोर आदी.

Next

येवला : महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा येवला यांच्या वतीने आयोजित काव्यस्पर्धेत एन्झोकेम विद्यालयाने सहभागी होत भारतरत्न अटलबिहारी बाजपेयी करंडक पटकावला आहे.
२९ डिसेंबर रोजी दोन गटांत ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत एन्झोकेम विद्यालयाची विद्यार्थिनी प्रतिमा खोकले हिने कवी कुसुमाग्रज पुरस्कार मिळवला. सत्यम सुरवाडे (एमएसजीएस विद्यालय, अंदरसूल) द्वितीय, तर निकिता ठोंबरे (जय जनार्दन विद्यालय, सावरगाव) हिने तृतीय क्रमांक मिळवला. स्वामी मुक्तानंद विद्यालयाची संपदा शहारे हिने कवी बाबूराव बागुल पुरस्कार मिळवला. कल्याणी पुंड (जनता विद्यालय, येवाला) द्वितीय, तर जान्हवी विटनोर (एन्झोकेम विद्यालय) तृतीय क्रमांक मिळवला. मोठ्या व छोट्या गटात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल एन्झोकेम विद्यालय भारतरत्न अटलबिहारी बाजपेयी करंडकाचा मानकरी ठरले. हे पुरस्कार ज्येष्ठ रंगकर्मी शकुंतला कानडे, कवी लक्ष्मण महाडिक यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य दत्ता महाले, साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष विक्र म गायकवाड, अध्यक्ष सूर्यकांत सस्कर, प्रा.भाऊसाहेब गमे, बाळासाहेब हिरे, बाळासाहेब सोमासे, अरु ण भावसार, सुवर्णा चव्हाण, प्रा. शरद पाडवी, शंकर अहिरे, वनिता वाघ, आणि रंजना चौधरी, दत्तकुमार उटावळे, बाळासाहेब हिरे उपस्थित होते.

यांचा झाला सन्मान
काव्य स्पर्धेनंतर झालेल्या पुरस्कार वितरण समारंभात शिक्षिका वनिता वाघ व रंजना चौधरी तसेच विद्यार्थी शुभम शिंदे, डॉ. महेश्वर तगारे यांचा त्यांनी आंतरराष्ट्रीय आयुर्वेद संस्थेचे सुवर्णपदक मिळविले म्हणून तर राज्य नाट्य स्पर्धेत येवल्यातून प्रथम सहभाग घेतला म्हणून शंकर अहिरे, प्रा. शरद पाडवी यांचा सन्मान करण्यात आला.

Web Title: Anzochem wins 'Atlantic Trophy'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.