‘आपुलकी’ने केला नवदुर्गांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 05:09 PM2019-03-09T17:09:43+5:302019-03-09T17:10:00+5:30
महिला दिन : आदिवासी खेळाडूंना साहित्य वाटप
पेठ - जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आपुलकी बहुद्देशीय सामाजिक ग्रुपच्यावतीने जिल्ह्यतील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कर्तृत्व गाजवणाऱ्या नऊ महिलांनाआदर्श माहिला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंतनू शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्र मात पेठ तालुक्यातील २० खेळाडू मुलींना साक्षी शार्दुल यांचेमार्फत स्पोर्टशुज वाटप करण्यात आले. तसेच सिन्नर तालुक्यातील भाग्यश्री शिंदे या बालखेळाडूला अशोक ठुबे यांनी शिक्षणासाठी दत्तक घेऊन त्याची पुढील खर्चाची जबाबदारी उचलली. साई दत्त संस्थेच्या वतीने अपंग व्यक्तींना सायकल वाटप करण्यात आली. पेठच्या किलबिल शाळेच्या चिमुकल्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्र माने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.
या प्रसंगी आदिवासी विकास विभागाच्या सहाय्यक प्रकल्प अधिकारी अनिता दाभाडे,डॉ. सतीश चितोडकर, अशोक ठुबे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष उत्तमराव तांबे, विजय राऊत, जयश्री राका, दौलतराव कुशारे, गिरीश बच्छाव, प्रणव शिंदे, भगवान हिरकुड, विष्णूपंत हगवणे, कविता डावरे, किशोर बडगुजर, तानाजी अष्टे,माणीक कानडे, खंडेराव डावरे, ज्ञानेश्वर सोमासे, बलराम माचरेकर, साक्षी शार्दूल, राकेश दळवी, जयंत राऊत,विलास कारेगावकर, संतोष पेठकर, डॉ. प्रभाकर पवार यांचेसह आपुलकी व साई दत्त संस्थेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. रामदास शिंदे यांनी सूत्रसंचालन केले तर दादासाहेब गायकवाड यांनी आभार मानले.
या नवदुर्गाचा झाला सन्मान
आपुलकीच्यावतीने डॉ. प्रणाली दुगड, भारती देवकर, संगीता पिंगळे, कुसुमताई शिंदे, माया गायकवाड, योगिता पेठकर, डॉ. गीता कुमठेकर, नंदा कुशारे, हिराबाई बामणे या नवदुर्गांचा मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला.