हुक्का पार्लरविरोधात निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 12:16 AM2017-09-18T00:16:26+5:302017-09-18T00:16:32+5:30

नाशिक हे संस्कृती, परंपरा, धार्मिक तीर्थक्षेत्र असून, शहराला हुक्का पार्लरचा डाग लागल्याने शहराची प्रतिमा कालवंडते आहे. नाशिक शहर हुक्का पार्लरमुक्त करावे, या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना मराठा महासंघाचे शहराध्यक्ष तुषार जगताप यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.

 Appeal against hookah parlor | हुक्का पार्लरविरोधात निवेदन

हुक्का पार्लरविरोधात निवेदन

Next

नाशिक : नाशिक हे संस्कृती, परंपरा, धार्मिक तीर्थक्षेत्र असून, शहराला हुक्का पार्लरचा डाग लागल्याने शहराची प्रतिमा कालवंडते आहे. नाशिक शहर हुक्का पार्लरमुक्त करावे, या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना मराठा महासंघाचे शहराध्यक्ष तुषार जगताप यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.
सध्या विविध ठिकाणच्या हुक्का पार्लरने वेढले आहे. त्यामुळे तरुण पिढी नशेच्या आहारी जात आहे. शहरात पोलिसांना अंधारात ठेवून अनधिकृत हुक्का पार्लर सुरू झाले आहेत.उच्चभ्रू वस्ती असलेल्या कॉलेजरोड, गंगापूररोड याप्रमाणे औद्योगिक वसाहत असलेल्या अंबड आदी ठिकाणी हे हुक्का पार्लर बिनधास्तपणे मध्यरात्रीपर्यंत सुरू ठेवले जातात. जिल्हा प्रशासनाने तत्काळ या अनधिकृत हुक्का पार्लरवर कारवाई करावी, अशी मागणी मराठा महासंघाने केली आहे. यावेळी मराठा महासंघाचे शहराध्यक्ष तुषार जगताप, योगेश नाटकर, विलास जाधव, सुरज सोळंकी, ज्ञानेश्वर जाधव, भाऊसाहेब तडाखे, विशाल कोशिरे, पवन पवार, मोहन गरुड आदी उपस्थित होते.

Web Title:  Appeal against hookah parlor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.