दिवाळी सुटीत कंपनीमालकांनी काळजी घेण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 01:24 AM2018-11-02T01:24:06+5:302018-11-02T01:24:59+5:30
सातपूर : दिवाळी सुटीत कंपनीमालकांनी कामगारांना कॅशलेस वेतन करावे, रोकड कंपनीत ठेवू नये आणि या काळात स्क्र ॅप विकू नये, बाकी जबाबदारी पोलीस घेण्यास तयार असल्याच्या विश्वास पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिला.
सातपूर : दिवाळी सुटीत कंपनीमालकांनी कामगारांना कॅशलेस वेतन करावे, रोकड कंपनीत ठेवू नये आणि या काळात स्क्र ॅप विकू नये, बाकी जबाबदारी पोलीस घेण्यास तयार असल्याच्या विश्वास पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिला.
निमात आयोजित पोलीस प्रशासन आणि निमा पदाधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. उपायुक्त कोकाटे यांनी सांगितले की, दिवाळी सुटीत औद्योगिक क्षेत्रात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार आहेच. दिवाळी सुटीत बंद असलेल्या कारखान्यांची यादी पोलिसांकडे देण्यात यावी. आजूबाजूच्या कारखान्यांकडे सुरक्षारक्षकांनी लक्ष ठेवावे, असे आवाहन उपायुक्त कोकाटे यांनी केले. यावेळी निमा पदाधिकाऱ्यांनी विविध सूचना केल्या. प्रास्ताविक निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी यांनी केले. स्वागत सरचिटणीस तुषार चव्हाण यांनी केले. यावेळी सहायक पोलीस आयुक्त शांताराम पाटील, पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे तसेच संजय महाजन, कैलास अहेर, नितीन वागस्कर, हिमांशू कनानी, सुधाकर देशमुख, अखिल राठी, संजय सोनवणे, मनीष रावळ, निखिल पांचाळ, प्रदीप पेशकार, संदीप भदाणे, प्रीतम बागुल, श्रीकांत बच्छाव, हर्षद ब्राह्मणकर, भाग्यश्री शिर्के, नीलिमा पाटील, शशिकांत जाधव, एन. डी. ठाकरे, गौरव धारकर आदी सहा निमा पदाधिकारी उपस्थित होते.दिवाळी सुटीत कोणीही स्क्र ॅप विकू नये, कॅशलेस वेतन करावे म्हणजे लुटीच्या घटना घडणार नाहीत. याकाळात सर्व वाहनांची कडक तपासणी केली जाईल.
बंद पथदीप सुरू करण्यात यावेत. वॉचमनकडे संपर्क क्र मांक ठेवण्याची व्यवस्था करावी.